आज आणि उद्या महाराष्ट्रातल्या ‘या’ भागात थंडीच्या लाटेची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि आसपासच्या भागांवर पश्चिमी चक्रवाताबरोबर चक्रीय स्थिती आहे. तसेच पंजाब, झारखंड, उत्तर कर्नाटकमध्ये अशीच स्थिती आहे. याचबरोबर 29 जानेवारीला पश्चिम हिमालयाच्या पायथ्यावर आणखी एक नवीन पश्चिमी चक्रवात घोंघावणार आहे.याबरोबरच महाराष्ट्रातही थंडी वाढणार असून राज्यातल्या काही भागात 25 आणि 26 तारखेला थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

या भागात थंडीच्या लाटेची शक्यता
राज्यातील उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस शीतलहर येणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.शीतलहरीमुळे या भागातील किमान तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअसच्या खाली येईल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार ते पाच दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

या सर्व स्थितीमुळे मंगळवारपासून मध्य आणि ईशान्य भारतातील पंजाब, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, छत्तीसगड, मध्य प्रदेश भागातील पश्चिमी भागात थंडीची तीव- लाट (शीतलहर) येणार आहे. ही लाट पुढील पाच दिवस राहणार असून, किमान तापमानाचा पारा 3 ते 5 अंश सेल्सिअस एवढा खाली येईल. थंडीच्या तीव्र लाटेबरोबरच दाट धुके राहण्याची शक्यता आहे.

पुण्यात पारा 7 अंशांवर
हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 25 रोजी पुण्यामध्ये कमीत कमी 7.1 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान माळीन येथे नोंदवण्यात आले आहे. त्याखालोखाल निमगिरी इथं 7.7 तळेगाव 7.9 पाषाण 8.2 हवेली 8.3 शिवाजीनगर 8.5 राजगुरुनगर 8.8 बालेवाडी 8.9 जुन्नर 9.2 शिरूर 9.9 गिरीवन 10.2 इंदापूर 10.4 दौंड 10.4 पुरंदर 10.4 खेड 10.6 ढमढेरे 10.8 आंबेगाव 11.1 लावले 12.3 चिंचवड 13.4 मगरपट्टा 14.5 आणि वडगाव शेरी 15.1 इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहेत.