राज्यात पुन्हा पावसाची शक्यता, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची माहिती ; पहा कधी आणि कोठे बरसणार सरी

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ओनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील तापमानाचा पार वाढतो आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात तर उष्णतेची लाट सुरु आहे. भारतीय हवामन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातील विदर्भ मराठवाडा भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामन अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २० ते २५ मार्चदरम्यान ढगाळ वातावरणासह काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे.

राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २० मार्च पासून राज्यामध्ये पुन्हा ढगाळ वातावरण तयार होणार आहे तर राज्यातल्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस हजेरी लावेल. यामध्ये मुख्यतः राज्यातील नाशिक, सांगली, सातारा , रत्नागिरी या भागांचा समावेश असेल अशी माहिती हवामान अभ्यासक डख यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे.

विदर्भात उष्णतेची लाट , काही भागाला यलो अलर्ट
बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा एकदा चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ‘असानी’ नावाच हे चक्रीवादळ असून दक्षिण-पूर्व बंगालच्या खाडीत हे चक्रीवादळ तयार झालं आहे. यामुळे आज अंदमान-निकोबारसह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ ताशी 65 ते 75 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहण्याची शक्‍यता असल्याने समुद्र किनारपट्टीला हाय अलर्ट देण्यात आला आहे. सध्या राज्यातल्या कोकण किनारपट्टी भागाला उष्णतेच्या तीव्र झळा सोसाव्या आहेत. मात्र येत्या 24 तासात विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या नागपूर विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, वाशीम या भागाला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.