महाराष्ट्राला थंडीचा विळखा…! ‘या’ भागात आजही शीतलहर कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात गोठवणार्‍या शीत वाऱ्यामुळे सध्या उत्तर महाराष्ट्रालाही थंडीचा विळखा पडलाय. राज्यातल्या अनेक भागांमध्ये किमान तापमान हे 10 अंश आणि त्यापेक्षा खाली गेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात आणखी दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे.

राज्यातल्या ‘या’ भागात थंडीची लाट

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र ,आणि मराठवाडा या भागात थंडीची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. नागपूर, गोंदिया, अमरावती आणि अकोला या भागात थंडीची लाट कायम राहणार असून या भागात थंडीच्या लाटेसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर देशातील पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली ,राजस्थान, मध्य प्रदेश, ओरिसा आणि छत्तीसगड या भागांमध्ये सुद्धा पुढचे तीन ते चार दिवस थंडी ची लाट कायम राहणार आहे अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान देशाच्या वायव्य आणि मध्य भारतात थंडीची लाट तीव्र झाली आहे.

आजचे(27) राज्यातील किमान तापमान

आज सकाळी म्हणजेच 27 जानेवारी रोजी कुलाबा इथं 18.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. सांताक्रुज 17.2 अंश सेल्सिअस तर पुणे इथं कमीत कमी 9.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पुण्यातही थंडी कायम असून पाषाण किमान 8.9 अंश सेल्सिअस, तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवेली इथं 9.1,NDA भागात 9.4, शिवाजीनगर भागात 9.8 आणि नेमगिरी इथं 9.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगाव 8.5, मालेगाव 8.8, औरंगाबाद 8.8 ,नांदेड 11.6, जालना 9.8 ,परभणी 10 ,नाशिक 10.4, अहमदनगर 9, महाबळेश्वर 10.4, बारामती 11.3, उस्मानाबाद 11.4 आणि जेऊर इथं अकरा डिग्री सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद आज सकाळी करण्यात आल्याची माहिती हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे.