राज्यात गारठा वाढणार…! देशात निचांकी 4.2 अंश तापमानाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडी परतायला सुरुवात झाली आहे. सोमवारी दिनांक 13 रोजी विदर्भातील यवतमाळ येथे नीचांकी 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज दिनांक 14 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गारठा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

देशात निचांकी 4.2 अंश तपमानची नोंद
वायव्य आणि उत्तर भारतातील राज्यात थंडी वाढतच आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, राजस्थान सह इतर राज्यात किमान तापमान सहा ते दहा अंशांच्या दरम्यान आहे. सोमवारी दिनांक 13 रोजी हरियाणाच्या हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्याचे कमाल तापमान कमी अधिक होत असून कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात दिवसाचे तापमान हे 30 अंश किंवा त्यापेक्षा खाली आले आहे. सोमवारी दिनांक 13 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे सर्वाधिक 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे सध्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात किमान तापमानात घट होत आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पंधरा वर्षांच्या वर घसरलाय. यवतमाळ पाठोपाठ निफाड येथे 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.