Dairy Business : घरची गुंठाभरही शेती नाही; दूध व्यवसायातुन कमावतोय वर्षाला 15 लाख रुपये!

Dairy Business Earning 15 Lakh Per Year
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसोबत जोडधंदा म्हणून पूर्वापार भारतामध्ये पशुपालन हा व्यवसाय (Dairy Business) केला जातो. पशुपालन व्यवसायासाठी शेतकरी प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन केले करतात. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन घेऊन, शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असतो. सध्या पशुपालन व्यवसाय हा व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असून, यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करताना आपल्याला दिसून येत आहेत. अशातच आज आपण अशा एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. जो डेअरी व्यवसायातून (Dairy Business) वार्षिक 15 लाखांपर्यंत टर्नओव्हर करत आहे.

एक गुंठाही शेती नसताना पदार्पण (Dairy Business Earning 15 Lakh Per Year)

अमोल यादव असे या तरुणाचे नाव असून, तो पूर्णतः भूमिहीन आहे. अमोलने कोल्हापूरजवळील शिरोली एमआयडीसीत काही काळ नोकरी केली. मात्र, त्या ठिकाणी फक्त महिन्याला पाच हजार रुपये पगार मिळत होता. ज्यामुळे त्याने डेअरी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु घरची एक गुंठा देखील शेती नसताना पशुपालन व्यवसाय सुरू करणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखे होते. परंतु सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी येथे अमोल यशवंत यादव या तरुणाने भूमिहीन असूनही पशुपालन व्यवसाय (Dairy Business) यशस्वी करून दाखवला आहे.

एका गायीहून केल्या आठ गायी

सुरुवातीला त्याने आर्थिक जमवाजमव करून, एक गाय आणि त्यानंतर तीन गाई विकत घेतल्या. असे मिळून त्यांच्या गोठ्यात चार गाई झाल्या. बंगळुरूहुन आणलेले एक गाय 25 लिटर दूध देत होती. आणि अन्य तीन गायी देखील उत्तम दूध देत होत्या. यामुळे आर्थिक चक्र व्यवस्थित सुरू झाले. अशा पद्धतीने हळूहळू पुढे आर्थिक बाबतीत स्थिरता मिळत गेल्यावर पुन्हा अमोलने, पंजाबवरून चार गाई आणल्या व आज सात वर्ष त्यांचा हा आठ गाईंचा गोठा व्यवस्थित सुरू आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

सध्या अमोल यादव यांना आठ गायींच्या माध्यमातून दिवसाला 120 ते 125 लिटर सरासरी दुधाचे उत्पादन मिळत आहे. अर्थात सरासरी आठवड्याला 40 ते 42 हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे. सध्या त्यांच्या गोठ्यामध्ये एक गाय 35 लिटर दूध देते. दोन गाई 28 ते 30 लिटर व बाकीच्या 25 लिटरच्या जवळपास दूध देतात. वासरांचे व्यवस्थापन देखील गोठ्यावरच केले व त्यातून तीन डेन्मार्क जातीची व दोन एबीएस जातीची वासरे तयार झाली आहे. हे सगळे दूध ते विठ्ठल डेरीच्या माध्यमातून वारणा दूध संघाला पाठवतात.