हॅलो कृषी ऑनलाईन: विन्स्टन चर्चिल (Farmers Success Stories) हा तामिळनाडू येथील शिवगंगई जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान याच्या सहाय्याने त्याच्या 50 एकर जमिनीत वेगवेगळी पिके घेऊन शाश्वत शेतीचे (Sustainable Farming) प्रत्यक्ष मॉडेल तयार केले आहे (Farmers Success Stories).
विन्स्टन चर्चिल याने त्याची बी.टेक (सिव्हिल इंजिनियरिंग) पदवी पूर्ण केल्यानंतर त्याच्या कुटुंबाचे मूळ व्यवसाय असलेल्या शेतीकडे (Farming) जाणे पसंत केले (Farmers Success Stories).
कृषी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेला, विन्स्टनचा शेतीचा प्रवास तामिळनाडूच्या शिवगंगई जिल्ह्यातील थामरक्की या गावात सुरू झाला. “माझ्या वडीलांच्या काळात, आम्ही 10 एकर शेती केली. आता, मी 50 एकर सांभाळतो,” असे विन्स्टन अभिमानाने सांगतो. आधुनिक तंत्रांचा अवलंब करून, तो शेतकामासाठी प्रगत यंत्रसामग्री (Advanced Agriculture Machinery) आणि कृषी तंत्रज्ञानाचा (Agriculture Technology) वापर करतो.
पावसाची कमतरता असलेल्या शिवगंगाई जिल्ह्यात, विन्स्टन एकल ठिबक सिंचनाचा (Drip Irrigation) वापर करून 50 एकर शेतजमिनीचे यशस्वीरित्या व्यवस्थापन करतो (Farmers Success Stories), ज्यामुळे त्याच्या कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. पाण्याचा वापर योग्य प्रकारे करण्यासाठी आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी या नाविन्यपूर्ण सिंचन पद्धतीच्या वापरावर त्यांनी भर दिला आहे .
विन्स्टन त्याच्या शेतात कसावा, मिरची, टोमॅटो आणि इतर हंगामी अशी विविध पिके घेतो. बाजारातील आव्हानाचा सामना करण्यासाठी आणि विविध राज्यांमध्ये, विशेषत: केरळमधील मागणीला टॅप करण्यासाठी तो कसावा पिकाची (Cassava Crop) मोठ्या प्रमाणावर लागवड करतो.
लागवडी सोबतच विन्स्टनने कसावासारख्या विशिष्ट पिकांच्या मार्केटिंगचे आव्हान सुद्धा स्वीकारले. कसावा लागवड (Cassava Cultivation) करताना मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत होणारे चढउतार, सुरुवातीच्या गुंतवणुकीमध्ये येणार्या महत्त्वपूर्ण अडचणी यांचा अभ्यास करून विन्स्टनने पिकांचे व्यवस्थापन (Crop Management) केले.
साबुदाणा (टॅपिओका पर्ल) निर्मिती प्लान्ट योजना (Farmers Success Stories)
विन्स्टन यांनी 8 ते 9 महिन्यांत कापणीला येणार्या कसावा पिकाची लागवड सोबतच त्यापासून तयार होणाऱ्या साबुदाणा निर्मिती (Tapioca) प्रक्रियेसाठी सुद्धा योजना आखली आहे. विशेष म्हणजे केरळमधील ICAR-CTCRI भेटीतून मिळालेल्या ज्ञानातून त्यांनी भविष्यात कसावा प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्याची कल्पना आली.
विन्स्टन यांनी कालव्याच्या सिंचनासाठी सरकारकडून उपलब्ध 75% अनुदानाचा लाभ घेतला. इतर शेतकरी मात्र फक्त 25% योगदानाचा लाभ घेतात. ही सबसिडी दर 7 वर्षांनी पुन्हा लागू केली जाऊ शकते. कालवा सिंचन प्रणाली 5 वर्षे प्रभावीपणे टिकून ठेवण्याची आव्हाने असूनही विन्स्टन प्रदेशातील शेती टिकवून ठेवण्यासाठी (Farmers Success Stories) एक महत्त्वपूर्ण उपाय म्हणून पाहतात.
पशुधन आणि मत्स्यपालन मध्ये विस्तार (Farmers Success Stories)
विन्स्टन कृषी व्यवसायासोबतच कुक्कुटपालन (Poultry Farming) आणि मत्स्यपालन (Fish Farming) हे कृषिपूरक व्यवसाय सुद्धा करतात. यासाठी त्यांनी 14,000 पिल्लांसह ब्रॉयलर कोंबडीपालन, खाद्य, पाणी आणि देखभाल सेवा व्यवस्थापित करण्यासाठी गुंतवणूक केली आहे. त्याचप्रमाणे, 200 शेळ्यांसह ते शेळीपालन (Goat Farming) सुद्धा करतात. पशुंचे आरोग्य आणि उत्पादकता सुनिश्चित करण्यासाठी विन्स्टन धोरणात्मक आहार पद्धती आणि वार्षिक लसीकरणावर भर देतात.
विन्स्टनने यांनी ‘स्नेक हेड मुरेल’ (Snakehead Murrel) जातीच्या 8000 कॅटफिशसाठी मत्स्यपालन तलाव विकसित केला आहे यातून त्यांना दरवर्षी नफा मिळतो. बाजारातील उच्च मागणीचा फायदा घेऊन, माशांची चांगली वाढ होण्यासाठी आणि ते विक्रीयोग्य होण्यासाठी विन्स्टन माशांच्या आहारावर विशेष लक्ष देतात. विन्स्टन चर्चिल हे शिवगंगाई जिल्ह्यातील शेतकर्यांच्या नवीन पिढीसाठी प्रेरणेचे प्रतीक आहेत, शाश्वत शेतीसाठी आधुनिक नवकल्पनांसह पारंपरिक ज्ञानाचे मिश्रण करत त्याने मिळवलेले यश (Farmers Success Stories) हे अधोरेखित करण्यासारखे आहे.