हॅलो कृषी ऑनलाईन : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली आज 22 रोजी विदर्भ, मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे मेघगर्जना आणि पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Valsad, Palghar and South Konkan Goa Klp looks cloudy with low and medium clouds in the latest satellite obs at 7.30 am 22 Sept.
Watch for these areas for next 3,4 hrs. pic.twitter.com/QpdJFSrPJ6— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 22, 2021
पावसाचा जोर वाढणार
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर पासून कोटा, रांची, कमी दाबाचे क्षेत्र केंद्र व बंगालच्या उपसागरात पर्यंत विस्तारलेला आहे. पूर्व राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा पासून तेलंगणा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाला आहे. त्या लगत समुद्रसपाटीपासून 5.8 किलो मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात शनिवार पर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून पूर्व किनाऱ्याकडे येणाऱ्या या प्रणालीमुळे पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.
प.बंगाल परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र, येत्या ४८ तासात तीव्रता कमी होण्याची शक्यता.ते प-उ/प दिशेने उ ओडीशा,उ छत्तीसगड व उ मध्य प्रदेशकडे पुढच्या ३ दिवसात सरकणार.
२१-२३ Sept राज्यात पावसात वाढ
२५ Sept सुमारास बंगालच्या उपसागरात परत एक नवीन सिस्टिम निर्माण होण्याची शक्यता
IMD pic.twitter.com/0oIMKoa9CY— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 21, 2021
आज या भागात पाऊस
आज कोकण, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात, बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात, अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून जोरदार वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या भागाला यलो अलर्ट
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, मराठवाडा, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना,, विदर्भातील, नागपूर, भंडारा, वर्धा आणि चंद्रपूर या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.