हॅलो कृषी ऑनलाईन : आता राज्यात पाऊस थांबला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. हळू हळू थंडी पडायला सुरुवात झाली आहे. धुक्यामुळे पिकांचे नुकसान होते. कांदा पिकाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास धुक्यामुळे कांदा पिकाचे शेंडे हे पिवळे होण्यास सुरुवात होते. कांद्याची पात झुकलेले दिसतात. धुक्यामुळे कांदा पिकावर मावा, करपा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. धुक्यापासून कांदा पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी काय करावे याची माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया …
१) हिवाळ्याच्या दिवसात कांद्याच्या पातींवर जे मोठ्या प्रमाणात दव साठलेले असते ते काढणे गरजेचे असते. त्याकरिता प्रेशर पंपाच्या साहाय्याने पाण्याची फवारणी करू शकता. त्यामुळे पाठीवरील धुके नाहीसे होऊन जाईल.
२) दुसरा उपाय म्हणजे सिलिकॉन बेस स्टिकर ची पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.
३) धुकं ज्यावेळी पडत असेल त्याच वेळी पिकावर फवारणी घेणे गरजेचे असते. दुपारी फवारणी घेऊ नये. पिकावर बुरशीनाशकांची फवारणी करू शकता
४) ज्या शेतकरयांचा कांदा स्प्रिंकलर्स किंवा रेन पाईप वर आहे त्यांनी सकाळच्या धुक्याच्या वेळात ५-१० मिनिटांसाठी स्प्रिंकलर्स सुरु करावेत.
५) धुक्यावर पूर्वीपासून चालत आलेला एक उपाय आहे ते म्हणजे पूर्वीच्या काळी शेतकरी लिंबाच्या पाल्याने कांद्याच्या पाठीवरील धुकं झटकायचे . हा देखील उपाय प्रभावी आहे.
६)तसे पाहिल्यास कांदा पिकाला रोजच्या रोज फवारणीची आवश्यकता नसते. मात्र रोजच दर धुके पडत असेल तर तीन दिवसातुन एकदा बुरशीनाशकाची फवारणी करावी. शक्यतो द्रव स्वरूपातील बुरशीनाशकाचा वापर करावा .