‘गुलाब’ चक्रीवादळ ओसरले मात्र प्रभाव कायम ; आज राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गुलाब चक्रीवादळ हे ओसरलं असलो तरी त्याच्या प्रभावामुळे असलेल्या अतीतीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज दिनांक 29 रोजी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्रातील वादळी प्रणाली आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा विखुरला गेला आहे. उत्तर कोकणापासून, आंध्रप्रदेश पर्यंत असलेला पूर्व आणि पश्चिम दिशेने वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा वादळी प्रणालीचा चक्राकार वाऱ्यामध्ये मिसळून गेला आहे. अरबी समुद्राकडे सरकत असलेल्या बादळी प्रणालीमुळे आज दिनांक 29 रोजी उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दक्षिण कोकण, उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील जोरदार पावसाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ऑरेंज अलर्ट– पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

यलो अलर्ट – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड ,परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या भागाला वादळी वाऱ्यासह आणि विधानसभा पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.