राज्यात दिवसा चटका तर पहाटे गारठा ; महाबळेश्वर मध्ये तापमान 13.7 अंश सेल्सिअसवर

winter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढलेली तफावत कायम आहे. गेले काही दिवस दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून किमान तापमान कमी झाल्याने पहाटे गारठा अनुभवायला मिळत आहे. आज दिनांक 27 रोजी राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाबळेश्वर गारठले

मान्सूनने सोमवारी 25 रोजी संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. राज्यातही मुख्यतः कोरडे हवामान असल्याने राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. कोकणासह राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असल्याने उन्हाचा चटका बरोबरच उकाड्यात ही वाढ झाली आहे.मंगळवारी दिनांक 26 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी इथं उच्चांकी कमाल 34.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 32 अंशच्या पुढे गेला आहे. तर बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा 15 ते 20 अंश या दरम्यान असून महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी 13.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून त्याच्या प्रभावामुळे आज उपसागराचा मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केरळ किनार्‍यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचा अंदाज आहे.