हॅलो कृषी ऑनलाईन: बांबू लागवड आजकाल शेतकर्यांसाठी (Farmers Success Story) आणि अर्थव्यवस्थेसाठी अधिक मौल्यवान वृक्ष म्हणून समोर येत आहे. म्हणूनच कदाचित त्याला ‘हिरवे सोने’ (Green Gold) म्हटले जाते (Farmers Success Story) .
लातूर (Latur) हे महाराष्ट्रात मराठवाड्यातील (Marathwada) मोठ्या शहरांपैकी एक आहे. हवामान बदलामुळे पाऊस कमी होत जाणारा पाऊस यामुळे या भागात तीव्र पाणी टंचाई (Water Scarcity) शेतकर्यांसाठी चिंतेचा विषय आहे. लातूर, मराठवाडा नेहमीच चर्चेत असतो तो शेतकर्यांची भीषण परिस्थिती आणि तेथील पाण्याच्या परिस्थितीमुळे. 2016 मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आले होते.
अशा या दुष्काळी भागात ‘हिरवे सोने’ म्हणून ओळखले जाणाऱ्या, बांबू पिकाची लागवड (Bamboo Farming) ही तेथील शेतकर्यांसाठी एक आशेचा किरण घेऊ आलेली आहे(Farmers Success Story).
बांबू (Bamboo) हा एक मजबूत वृक्ष असून याला पाण्याची फार कमी गरज असते. बांबूच्या लागवडीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचे बाष्पीभवन सुद्धा कमी होते जे दुष्काळी भागांसाठी एक आदर्श स्थिती आहे.
“माझ्या जमिनीत, पाण्याच्या प्रवाहामुळे माती वाहून जायची आणि ही सर्वात वरची निरोगी माती आहे जी माझ्या भाज्यांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची आहे. माझ्याकडे 10 एकर जमीन आहे आणि मी दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील आहे. पाण्याची थोडीशी बचतही आम्हा शेतकर्यांना खूप मदत करते,” असे या भागातील शेतकरी शंतनू सांगतात (Farmers Success Story).
या सर्व बदललेल्या परिस्थितीचे श्रेय जाते ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नैसर्गिक शेती (Art Of Living Natural Farming) पद्धतीला. आर्ट ऑफ लिव्हिंगने आतापर्यंत भारतातील 22 लाख शेतकर्यांना प्रशिक्षित केले आहे जे आता रासायनिक खते, जनुकीय सुधारित बियाणे आणि कीटकनाशकांऐवजी नैसर्गिक शेती (Natural Farming) द्वारे शेतजमिनींचे पुनरुज्जीवन करत आहेत. आज दुष्काळी भागातही नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करणारे शेतकरी स्वावलंबी (Farmers Success Story) झाले आहेत.
“आम्ही जिथे जायचो तिथे बांबूच्या बिया गोळा केल्या. सध्या आमच्याकडे बांबूची 1.5 लाख रोपे लावण्यास तयार आहेत आणि या जुलैपासून वृक्षारोपण सुरू होईल. ही बांबूची झाडे शेताच्या बांध्यावर लावल्यास वाऱ्याला अडथळा निर्माण होऊन शेतकर्यांची इतर पिके वाचतील. बांबू हा शेतकर्यांचा पिकांचा अंगरक्षक आहे” असे आर्ट ऑफ लिव्हिंग प्रकल्पाचे प्रमुख महादेव गोमारे सांगतात (Farmers Success Story) .
2018-19 मध्ये, बांबू मूल्य साखळीचा सर्वांगीण विकास सुलभ करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय बांबू मिशन सुरू केले, तर NITI आयोग (NITI Ayog) बांबूचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी सर्वसमावेशक धोरणावर काम करत आहे. ‘बांबू साठी वेगवेगळी धोरणे आणण्याकडे सरकारचे आता बरेच लक्ष असेल आणि त्यातून खूप काही करता येईल. बांबूपासून बनवलेले सुंदर बंगळुरू विमानतळ पहा,’ असे महादेव गोमारे सांगतात.
ते पुढे म्हणतात, ‘शेतकर्यांसाठीही बांबू खूप मौल्यवान आहे कारण ते दरवर्षी काढता येते आणि त्यातून शेतकरी दरवर्षी पैसे कमवू शकतात.’
महादेव गोमारे यांचे ध्येय केवळ रोपांचे वाटप करण्यावरच थांबत नाही तर शेतकर्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित करणे सुद्धा आहे. त्याला एक कौशल्य विकास केंद्र सुरू करायचे आहे जिथे तरुण आणि शेतकरी बांबूपासून उत्पादने बनवायला शिकतील आणि या द्वारे हजारो लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांच्या चांगल्या उपजीविकेसाठी हातभार लागेल.
‘जास्तीत जास्त लोकांनी बांबू पिकवणे फार महत्त्वाचे (Bamboo Benefits For Environment) आहे कारण ते मातीची धूप रोखते आणि जल संधारणास मदत करते. बांबूची मुळे पाणी शोषून घेतात आणि साठवतात ज्यामुळे कमी पाणी उपलब्ध असताना शेतकर्यांना शेतीसाठी मदत होते. इतर कोणत्याही वनस्पतीच्या तुलनेत बांबू तुम्हाला 30% जास्त ऑक्सिजन देतो आणि जास्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. ज्या काळात आपल्या मेट्रो शहरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, ती वेळ दूर नाही जेव्हा आपण उलट स्थलांतर पाहणार आहोत. पाणी नसल्यामुळे लोक गावाकडे जाऊ लागतील. शेतकर्यांसाठी विशेषतः शेतीतून पाण्याची बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे’, असे महादेव गोमारे सांगतात. अलीकडेच, FPJ बातम्यांनुसार, पाशा पटेल, कृषी पॅनेलचे प्रमुख देखील म्हणाले, ‘बांबू हवामान बदलाशी लढण्यास मदत करू शकतो, शेतकर्यांना उपजीविका प्रदान करू शकतो’
“मी बांबू लावल्यापासून बोअरवेलमध्ये पाण्याची पातळी वाढलेली पाहीली आहे. माझ्या 10 एकर जमिनीत माझ्याकडे 500 झाडे आहेत आणि एकदा पूर्ण वाढ झाल्यावर मला दरवर्षी अतिरिक्त उत्पन्न मिळेल. म्हणून मी पाणी वाचवतो, मी माझी माती वाचवतो आणि मी जास्त पैसे कमवतो. माझ्यासारख्या शेतकर्यांसाठी हे सोन्याचे रोप आहे,” प्रकल्पाचा लाभ घेणार्या शेतकऱ्यांपैकी एक शंतनू सांगतो (Farmers Success Story).