राज्यातील ‘या’ भागात २-३ दिवस मुसळधार पाऊस, महाबळेश्वर मध्ये 48 तासात 1074.4 मिलीमीटर पावसाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूण, रायगड अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातल्या अनेक भागात दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याने पाऊस आणखी दोन-तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार अति मुसळधार प्रमाणात पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. हवामान खात्याचे तज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसंच सोमवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

येथे जोरदार पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन चार तासात ठाणे, औरंगाबाद, बीड, सांगली, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मागील 48 तासात महाबळेश्वर येथे 1074.4 मिमी पावसाची नोंद

महाबळेश्वर या ठिकाणी पावसाची तीव्रता आणखी वाढली आहे आणि मागील 48 तासात महाबळेश्वर येथे तब्बल 1074.4 मिमी इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे तज्ञ केस होसाळीकर यांनी दिली आहे. हवामान खात्याच्या रडार वरून दिलेल्या माहितीनुसार सध्या रायगड, रत्नागिरी आणि पुणे, सातारा या भागांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे ढग दाटून आल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

दरम्यान आज सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी नोंदवलेल्या नोंदीनुसार रायगड, ठाणे, रत्नागिरी, चिपळूण, सातारा आणि पुण्याचा घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात ढग साचले आहेत. यथे जोरदार पावसाची शक्यता आहे.

रायगड-रायगड जिल्हा,रोहा धीरा माथेरान श्रीवर्धन.
ठाणे – ठाणे जिल्हा, कल्याण
रत्नागिरी -जिल्हा, दापोली, हरनाई
चिपळूण
संपूर्ण सातारा
पुणे घाट परिसर