Milk Processing Business : दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती उद्योगात उतरा; कमवाल बक्कळ नफा!

Milk Processing Business
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवड्यात राज्यातील गाईच्या दूध दरात प्रति लिटरमागे २ रुपयांनी कपात (Milk Processing Business) करण्यात आली आहे. ज्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कमी दूध दराचा सामना करावा लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिंती उद्योगामध्ये उतरणे, गरजेचे ठरत आहे. दूध हा पदार्थ नाशवंत आहे. मात्र, शेतकरी बाजारपेठेतील मागणीचा कल ओळखून त्यानुसार प्रक्रियाकृत उत्पादने तयार करू शकतात. दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन करण्याचा विचार केला तर अतिशय माफक असून, कमी किमतीत चांगला नफा (Milk Processing Business) देणारा हा व्यवसाय आहे.

बाजारात प्रचंड मागणी असलेले दुग्धजन्य पदार्थ (Milk Processing Business)

तूप निर्मिती : अतिशय साधे व सोपे मशीन व उपकरणांच्या साहाय्याने दुधापासून तूप बनवता (Milk Processing Business) येते. तुम्ही तुमच्या घरात देखील तूप बनवण्याचा युनिट उभारू शकतात. यासाठी जास्त जागा लागते असं काही नाही. तुम्ही अगदी घरातून दूध उत्पादन व्यवसाय सुरू करू शकतात.

दुधापासून आईस्क्रीम निर्मिती : दुधापासून बनवलेले आईस्क्रीम सर्वाधिक जास्त प्रमाणात विकली जाते. आईस्क्रीम उत्पादन देखील तुम्ही अगदी छोट्या स्वरूपात सुरू करून उत्पादन करू शकतात. आईस्क्रीम निर्मितीची प्रक्रिया देखील अत्यंत सहज व सुलभ असून आपली गुंतवणूक क्षमता पाहूनच विविध आईस्क्रीम पूरक उत्पादने बनवता येऊ शकतात.

दुधापासून लस्सी निर्मिती : भारतामध्ये पॅकेज लस्सी मोठ्या प्रमाणात विकली जाते. यामध्ये अमूल या कंपनीचे नाव अग्रस्थानी आहे. यामध्ये हर्बल लस्सी हा एक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले उत्पादन असून, तुम्ही आवश्यक प्रशिक्षण घेऊन अगदी अल्पशा गुंतवणुकीतून लस्सी उत्पादन सुरू करू शकतात.

चीज केकची निर्मिती : मऊ व ताजा चीज,अंडी आणि साखर यांनी बनवलेला चीज केकला अत्यंत मागणी असून याला बनवण्यासाठी एक स्वतंत्र जागा आणि काही छोट्या मशिनरीच्या आवश्यकता असते.

बाटलीबंद दूध : आताच्या काळात नागरिक आरोग्याच्या बाबतीत फारच जागरूक असून प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेला खूप महत्व देत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवासादरम्यान असो की मोठ्या शहरांमध्ये बाटलीबंद दुधाला प्रचंड मागणी आहे. बाटलीबंद दूध निर्मितीमध्ये बाटलीत दूध भरण्यासाठी ‘वोल्युमॅट्रिक फिलिंग मशीनची’ आवश्यकता असते.