हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने (Onion Buffer Stock) वारंवार पावले उचलल्याचे आपण पाहिले आहे. पण येणाऱ्या काळातही कांद्याचे दर वाढू नयेत आणि देशात कांद्याची कमतरता भासू नये. यासाठी केंद्र सरकारने अजून एक पाऊल उचलले असून, 1 लाख टन कांद्याचा राखीव स्टॉक करण्यासाठी कांद्याचे विकिरण (Onion Buffer Stock) करण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
गुणवत्तापूर्ण कांद्यासाठी सरकारची योजना (Onion Buffer Stock)
दरम्यान, यंदा म्हणजेच 2023-24 या वर्षामध्ये पावसाच्या कमतरतेमुळे कांद्याचे उत्पादन (Onion Buffer Stock) कमालीचे घटले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कांद्याच्या उत्पादनात 16 टक्क्यांनी घसरण होऊन, 2 कोटी 54 लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे. देशांतर्गत कांद्याचे घटते उत्पादन लक्षात घेता सरकारने कांद्याची साठवणूक करण्यासाठी पावले उचलली असून, कांद्याचे जीवनमान वाढवण्यासाठी आणि कांदा खराब न होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकिरण तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सरकारची योजना असल्याचेही ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
50 विकिरण केंद्रांचा शोध
कांदा उत्पादन होणाऱ्या भागामध्ये केंद्र सरकारकडून 50 विकिरण केंद्रे शोधली जात असून, असे झाल्यास यावर्षी १ लाख टन विकिरण प्रक्रिया केलेला कांदा साठवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर नाफेड आणि एनसीसीएफलाही 5 लाख टन कांद्याचे बफर स्टॉक करण्यासाठी सोनपत, ठाणे, नाशिक आणि मुंबईसारख्या भागांत विकिरण केंद्रे शोधण्यास सांगितले आहे. तर मागच्या वर्षी जवळपास 1 हजार 200 टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली होती. असेही वृतांत म्हटले आहे. कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर आता बफर स्टॉक करून दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असून, यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर वाढणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.