Onion Processing Business : कांदा प्रक्रिया उद्योग; वाचा… कसा कमवायचा भरघोस नफा, लागतात ‘ही’ यंत्रे!

Onion Processing Business For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा पिकाची लागवड (Onion Processing Business) महाराष्ट्रामध्ये कमी अधिक तर प्रमाणामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये होते. कांदा पिकाचा विचार केला तर कायमच भावाच्या बाबतीत अनिश्चितता असलेले हे पीक आहे. मागील सहा महिन्यांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा भावातील घसरणीचा सामना करत आहे. परिणामी, कांदा दराबाबत नेहमीच अनिश्चितता असल्याने, शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादित कांद्यावर प्रक्रिया उद्योग (Onion Processing Business) सुरु करणे गरजेचे झाले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना होणार आर्थिक नुकसानीचा धोका टळून अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होऊ शकते.

आर्थिक समृद्धीचा स्त्रोत (Onion Processing Business For Farmers)

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन मिळवतात. मात्र, कांद्याचे भरघोस उत्पादन घेऊनही बाजारभावाच्या अभावाने कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणेही अवघड होऊन बसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण कांद्यावर प्रक्रिया करत शेतकरी कसा आर्थिक समृद्धीचा स्त्रोत निर्माण करू शकतात. तसेच प्रक्रिया उद्योगादरम्यान कांद्याचे निर्जलीकरण नेमके काय आहे? यामुळे कांदा पिकापासून शेतकऱ्यांना कसा फायदा मिळू शकतो? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कशी कराल कांदा प्रक्रिया?

डीहायड्रेशन : डीहायड्रेशन या प्रक्रियेमध्ये कांद्याचे बारीक काप केले जातात. डीहायड्रेशन मशीनचा किंवा उन्हामध्ये कांद्याच्या कापांना (Onion Processing Business) वाळवले जाते. कांद्याच्या या वाळवलेल्या तुकड्यांना बारीक केले जाते व त्यांची पावडर तयार करून बाजारात जास्तीत जास्त किमतीला विकली जाते. यासाठी तुम्हाला एक लाख 50 हजार ते पाच लाखांपर्यंतचे भांडवल लागू शकते. यासाठी कांदा हा कच्चामाल असून, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात लागवड होतो. किंवा मग कांदा खरेदी विक्री केंद्रजवळ आहेत. अशा ठिकाणी वाहतूक खर्च कमी व्हावा, या उद्देशाने हा प्रक्रिया उद्योग उभारणे फायद्याचे ठरते.

लागणारी यंत्रसामग्री : हा उद्योग जर तुम्हाला छोटेखानी स्वरूपात सुरु करायचा असेल तर कांद्याचे तुकडे करण्यासाठी कटिंग मशीनची तर कांद्याचे काप वाळवण्यासाठी ड्रायर आणि वाळवलेल्या तुकड्यांपासून पावडर तयार करण्यासाठी ग्राइंडर मशीनची आवश्यकता भासते. या प्रक्रिया उद्योगातून तयार होणारा माल पॅकिंग करण्यासाठी पॅकेजिंग मशिन देखील लागते. जर यामध्ये तुम्ही स्वयंचलित यंत्रांचा वापर केला तर उत्पादन क्षमता वाढवू शकतात. सोलर ड्रायर घेण्यासाठी, तुम्हाला 65 हजाराच्या पुढे खर्च येऊ शकतो. तर ग्राइंडर मशीन हे 8000, पॅकेजिंग मशिन 1500 रुपये इतका खर्च येऊ शकतो. दोन किंवा पाच व्यक्तीच्या मनुष्यबळापासून तुम्ही हा व्यवसाय करू शकतात.

कुठे कराल मालाची विक्री : कांदा प्रक्रिया उद्योगातून तयार होणारा माल, तुम्ही मसाले तयार करणाऱ्या कंपन्यांना विकू शकतात. तसेच तुमच्या आसपासच्या शहरांमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये देखील हा माल पुरवू शकतात. कारण या उत्पादनाची आता मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेफर्स तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील कांदा पावडर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. अशा कंपन्यांसोबत तुम्ही टायअप करू शकतात व तुमचा व्यवसाय वाढवू शकतात.