Onion Rate : मतदान केंद्रांवर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त; कांद्याची माळ घालून केले मतदान!

Onion Rate Issue In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून पेटता असलेला कांद्याचा प्रश्न (Onion Rate) अद्यापही लाल फितीत अडकून आहे. निर्यात खुली करूनही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे. अशातच आज राज्यासह देशात चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त कारण्यासाठी कांद्याची माळ (Onion Rate) घालून मतदान केले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

जळगाव, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील घटना (Onion Rate Issue In Maharashtra)

आज राज्यात प्रामुख्याने जळगावसह, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील तीन मतदार संघांसह अकरा जागांवर मतदान होत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरु आहे. आज मतदानाच्या वेळी चोपडा येथे गळ्यात कांद्याची माळ घालून, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संदीप पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर अहमदनगर जिल्ह्यात देखील एका मतदाराने गळ्यात कांद्याची माळ घालू मतदान केले आहे.

हिताचे निर्णय केव्हा घेणार?

याशिवाय अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथेही असाच प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. टाकळी लोणार येथील कांदा उत्पादक शेतकरी सोमनाथ गोडसे, संदीप कुंनगर यांनी कांद्याची माळ घालून मतदानाचा हक्क बजावला. दूध दर तसेच शेतीमालाच्या बाजारभावासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये रोष असून, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केव्हा घेणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात उस्थळ दुमाला येथील कांदा उत्पादक शेतकरी त्रिंबक भदगले यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केले‌. यावेळी मतदान केंद्रावर केंद्रावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी कांद्याला व दुधाला भाव नसल्याने सरकारचा निषेध केला. तर सहा दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. या दिवशी शेतकरी संघटेनचे पदाधिकारी असलेल्या शिवाजी नांदखिले यांनी कांद्याची माळ गळ्यात घालत आपल्या परिवारासोबत मतदान केले.