Onion Seeds : राहुरी विद्यापीठाच्या कांदा बियाण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड; पोलीस बंदोबस्तात होतीये विक्री!

Onion Seeds For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप आणि लेट खरीप हंगामातील कांदा लागवड (Onion Seeds) मोठ्या प्रमाणात होते. या दोन्ही हंगामात कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची उत्तम बियाणे खरेदीसाठी नेहमीच झुंबड पाहायला मिळते. मात्र, आता दर्जेदार आणि किफायतशीर असलेल्या ‘फुले समर्थ’ आणि रब्बीसाठी उपयुक्त असलेल्या ‘फुले बसवंत’ या वाणाच्या कांदा बियाणांसाठी शेतकऱ्यांनी मागील २१ मेपासून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात गर्दी केली आहे. अवघ्या तीन दिवसांत आतापर्यंत ११० क्विंटल कांदा बियाणे (Onion Seeds) विक्री झाले असून, अजूनही ४० क्विंटल शिल्लक असल्याचे विद्यापीठाच्या बियाणे विभागाने म्हटले आहे.

शनिवार, रविवारीही मिळणार कांदा बियाणे (Onion Seeds For Farmers)

शेतकऱ्यांसाठी शनिवार व रविवार या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही कांदा बियाणे (Onion Seeds) विक्री सुरू असणार आहे. सध्या १५०० रुपये प्रति किलो या दराने हे बियाणे विक्री होत आहे. एक एकर कांदा लागवडीसाठी सुमारे तीन किलो बियाणांची आवश्यकता पडते, असे येथील विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. बाजारात खासगी कंपन्यांच्या कांदा बियाणे अडीच ते तीन हजार रुपये प्रति किलो दराप्रमाणे मिळते. त्यामुळे स्वस्त व दर्जेदार असणाऱ्या फुले समर्थकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

हेही वाचा : ‘या’ दिवसापासून शेतकऱ्यांना मिळणार कांदा बियाणे; राहुरी विद्यापीठाची माहिती! (https://hellokrushi.com/onion-seeds-farmers-rahuri-agriculture-university/)

पोलिस बंदोबस्तात विक्री

राहुरी विद्यापीठात कांद्याचे वाण घेण्यासाठी नगर, नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील विविध भागातून दरवर्षी शेतकरी गर्दी करतात. यंदा ही गर्दी टाळण्यासाठी विद्यापीठाने विभागात १० कांदा बियाणे विक्री केंद्रांची व्यवस्था केली. तरीही विद्यापीठात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढतीच आहे. अनेक शेतकऱ्यांनी रात्रीच विद्यापीठात मुक्काम ठोकून सकाळी बियाणे रांगेत उभे राहण्याला प्राधान्य दिले. ज्यामुळे प्रत्यक्ष विक्रीच्या वेळेस गर्दी अनियंत्रित होऊ नये म्हणून यंदाही पोलिसांचा बंदोबस्त मागवावा लागल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

या ठिकाणी मिळेल बियाणे

  • मध्यवर्ती विक्री केंद्र बियाणे विभाग राहुरी,9422921816
  • कृषि संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक, 9604261101
  • कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक, 9421241175
  • कृषि संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर 7588695567
  • कृषि संशोधन केंद्र, बोरगांव, जि. सातारा, 9850687253
  • कृषि महाविद्यालय, मालेगाव जि. नाशिक,9421610791
  • कृषि संशोन केंद्र लखमापुर,7698536873
  • कृषि विज्ञान केंद्र, धुळे, 8208171119
  • कृषि महाविद्यालय, पुणे, 9405854606
  • कृषि महाविद्यालय, हाळगाव ता. जामखेड जि. अहमदनगर 7588489762