Onion Variety : या वाणाद्वारे कांदा लागवड करा; तुमचा कांदा वर्षभर सडणार नाही!

Onion Variety Stored For A Year
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे कांदा पीक (Onion Variety) महाराष्ट्रासह देशातील बऱ्याच भागांमध्ये घेतले जात आहे. कांदा पिकाची अडचण ही असते की कधी तुटवडा निर्माण झाल्यास, भाव गगनाला भिडतात. तर कधी उत्पादन अधिक झाल्यास कांदा पिकातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही. मात्र, आता शेतकऱ्यांना अधिक काळ कांदा साठवून ठेवता यावा. आणि त्यातून त्यांना चांगला भाव मिळून योग्य उत्पन्न मिळवता यावे. यासाठी कांदा पिकाचे नवीन वाण समोर आले आहे. या नवीन कांदा वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रजातीचा कांदा एक वर्ष साठवून ठेवला तरीही तो खराब होत नाही. त्यामुळे या नवीन कांदा वाणाला (Onion Variety) देशातील सर्वोत्तम कांदा वाण समजले जात आहे.

एग्रीफ्राउंड लाइट रेड-4 वाण (Onion Variety Stored For A Year)

एग्रीफ्राउंड लाइट रेड-4 असे या नवीन कांदा वाणाचे (Onion Variety) नाव असून, ते कांदा शेतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. कारण आज लाल कांदयाचे उत्पादन घेतल्यानंतर तो केवळ काही दिवसच चांगला राहतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना अगदी कमी किमतीत आपला कांदा विक्री करावा लागतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. अशा परिस्थितीत एग्रीफ्राउंड लाइट रेड-4 हे कांदा वाण शेतकऱ्यांना साठवून ठेवण्यासाठी चांगला पर्याय ठरणार आहे. हे नव्याने विकसित करण्यात आलेले कांदा वाण अधिक काळापर्यंत चांगले राहते.

काय आहेत या वाणाची वैशिष्ट्ये?

कांद्याचे हे वाण उत्तरप्रदेशातील कानपूरच्या कृषी प्राद्योगिकी आणि संशोधन संस्थेने विकसित केले आहे. या वाणाचा कांदा हा एक साठवून ठेवला तरी खराब होत नाही. त्याला सामान्य परिस्थितीत कोंब फुटत नाही. या वाणाचा रंग काहीसा फिकट लाल असतो. हा कांदा खाण्यास तिखट असतो. कांद्याच्या या वाणाचे बियाणे चालू वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बियाण्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अधिक काळापर्यंत टिकणाऱ्या कांद्याची शेती करता येणार आहे. असे कानपूर येथील कृषी प्राद्योगिकी आणि संशोधन संस्थेने म्हटले आहे.

पावसाळी कांद्यासाठी प्रभावी ठरणार

कांद्याच्या या नवीन वाणामुळे शेतकऱ्यांना पावसाळी कांदा पिकवताना मोठी मदत होणार आहे. कारण पावसाळ्यात कांद्याचे उत्पादन घेताना, त्यात पाणी अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे कांद्याला ओलावा मिळून लवकर कोंब फुटतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना आहे त्या भावात पावसाळी कांदा विकावा लागतो. मात्र, आता या नवीन वाणाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना या समस्येपासून सुटका मिळणार आहे.