विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा गारपीटीसह पाऊस; पहा कसे असेल आज तुमच्या भागातील हवामान ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय विभागाने वर्तवलेला अंदाज अगदी खरा ठरला. बुधवारी दिनांक २९ रोजी विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा एकदा जोरदार वारा आणि गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. आज मात्र नागपूर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील हवामा कोरडे राहण्याचा अंदाज आहे. याबरोबरच देशाच्या उत्तरेकडील थंडी वाढणार असल्याने त्याचा परिणाम राज्यातल्या वातावरणावर होणार असून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात देखील गारठा वाढणार असल्याचा अंदाज आहे.

राज्यात गारठा वाढणार
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून आज दिनांक 30 रोजी पंजाब मध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर झारखंड, बिहार, ओरिसा मध्ये जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात आजपासून पाऊस उघडीप देणार असून मुख्यतः कोरडे हवामान राहणार आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्यानंतर उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या उत्तर भागात थंडीचा कडाका वाढणार आहे.

पुण्यात कमीत कमी ११.७ तापमान

राज्यातल्या मराठवाडा, विदर्भात गारांसह पावसाने हजेरी लावल्यानंतर आता राज्यात थंडी वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. आज ३० रोजी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार पुणे जिल्ह्यातील माळीण येथे सर्वात कमी ११.७ सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.