राज्यात पुन्हा हुडहुडी… ! अनेक भागात एकअंकी तापमानाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :राज्यामध्ये अवकाळी पावसानंतर आता तापमान कमालीचे घसरले आहे. राज्यात पुन्हा एकदा एक अंकी तापमान नोंदविण्यात आले आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये यंदाच्या हंगामातील राज्यातील सर्वात कमी 6.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. दरम्यान आज दिनांक (११) रोजी उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. खानदेशात रविवारी रात्री पारा घसरून सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. सातपुडा पर्वतातील दाब येथे किमान तापमान पाच अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. धुळ्यातील तापमान सात अंश सेल्सिअस एवढे होते तर जळगावातील रावेर, चोपडा, धरणगाव, अमळनेर या भागात किमान तापमान सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते.

उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे

पाकिस्तान आणि जम्मू कश्मीर परिसरावर पश्‍चिमी चक्रावात सक्रिय असून उत्तर हरियाणामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे पंजाब, हरियाणा, चंदिगड, राजस्थानमध्ये थंडीची लाट आली आहे. राजस्थानमधील सि कार आणि भीलवाडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असताना किमान तापमानात मोठी घट झाली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी किमान तापमानात तीन ते सहा अंशांची घट झाल्याने अचानक गारठा वाढला. उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवसात किमान तापमानात दोन ते चार अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या भागाला अलर्ट जारी

11- दिनांक अकरा रोजी यवतमाळ, वर्धा ,नागपूर, चंद्रपूर, गोंदिया ,भंडारा आणि गडचिरोली या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

12- दिनांक 12 रोजी यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहेत या भागाला यलो अलर्ट दिला आहे.

13- यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली ,वर्धा ,नागपूर, भंडारा ,आणि गोंदिया या भागाला यलो अलर्ट देण्यात आला