कुठे कडक ऊन तर कुठे पावसाचा इशारा ; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात बऱ्याच शहरांमध्ये तापमानाचा पारा चाळीस अंशांच्यावर गेला आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे. संपूर्ण देशाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास काही भागात कडाक्याचे ऊन तर काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु असून हा सिलसिला अजून कायमच आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाच्या झळा असह्य होत आहेत तर दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

१५-१७ तारखेदरम्यान तामिळनाडूच्या घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर १६ ते १७ दरम्यान केरळ(माहेवर) मुसळधार पाऊस होईल ; 15-18 दरम्यान दक्षिण अंतर्गत कर्नाटकात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

पंजाब, हरियाणा-चंदीगढ-दिल्ली आणि वेगवेगळ्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.15-19 दरम्यान राजस्थान मध्ये 17-19 दरम्यान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आणि बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

कुठे किती तापमान ?
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 एप्रिल रोजी अकोला येथे 42.9, अमरावती 40.8, बुलढाणा 40, ब्रह्मपुरी 42.3, चंद्रपूर 43,गडचिरोली 40.6,गोंदिया 41.00 वर्धा 42, यवतमाळ 41.5 असे कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे.