Soyabean Variety : सोयाबीनचे ‘हे’ नवीन वाण विकसित; शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात होणार उपलब्ध!

Soyabean Variety For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक (Soyabean Variety) आहे. या पिकाची लागवड राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील सोयाबीन लागवड केली जाते. मात्र, या विभागात होणारी लागवड ही खूपच मोजकी आहे. तथापि राज्यातील विदर्भ, मराठवाडा या विभागात सोयाबीनची विक्रमी लागवड होत असून देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात (Soyabean Variety) महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागतो.

40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात (Soyabean Variety For Farmers)

देशातील एकूण उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. यावरून सोयाबीन पिकावर राज्यातील शेतकऱ्यांचे अवलंबित्व स्पष्ट होते. दरम्यान येत्या काही दिवसात सोयाबीन पीक पेरणीला सुरुवात होणार आहे. अशातच यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अलीकडेच विकसित झालेले सोयाबीनच्या एका नवीन जातीचे बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

95 ते 105 दिवसात येते काढणीला

दफ्तरी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विकसित केलेले ‘दफ्तरी 354’ हे सोयाबीन वाण बाजारात उपलब्ध होणार आहे. आज आपण या जातीची विशेषतः जाणून घेणार आहोत. सोयाबीनचे हे अलीकडेच विकसित झालेले वाण मध्यम कालावधीत परिपक्व होत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. सोयाबीनचे हे वाण 95 ते 105 दिवसात हार्वेस्टिंगसाठी तयार होते.

रोगांना नाही पडत बळी

सोयाबीनच्या या जातीची पेरणी करायची असेल तर दोन ओळींमधील अंतर 16 ते 18 इंचा पेक्षा जास्त नसावे. या जातीची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे यामध्ये तणाचा प्रादुर्भाव होत नाही. या जातीच्या सोयाबीनला तीन ते चार दाण्यांच्या शेंगा मोठ्या प्रमाणात लागतात. विषाणूजन्य रोगांसाठी ही जात प्रतिकारक असल्याचे आढळले आहे. शेंगा पक्व होऊन दाणे गळत नाहीत, यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे.