सोयाबीनचे दर 2000 -5500 च्या टप्प्यातच ; पहा कोणत्या बाजर समितीत किती भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाने उसंत घेतल्यामुळे राज्यात सोयाबीन पिकाच्या काढणी आणि मळणी ला वेग आला आहे. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे उरल्या सुरल्या सोयाबीन कडे शेतकरी अपेक्षा ठेऊन आहेत. मात्र बाजारपेठेत सोयाबीनचा भाव काही वाढताना दिसून येत नाहीये . राज्यातील बहुतांशी बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे भाव हे 2000 -5500 च्या दरम्यान आहेत. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असली दर मात्र जैसे थे आहेत.

सोयाबीन सोडून इतर शेतमालात दरवाढ

मागच्या हंगामात विक्रमी 11 हजार एवढा दर घेतलेल्या सोयाबीनने मात्र यंदा शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. सोयाबीनला क्विंटलला जास्तीत जास्त भाव हा केवळ 5500 च्या आसपासच आहे. त्याच्या तुलनेत इतर पिकांचे तसेच भाजीपाल्याचे दर देखील वधारल्याचे पाहायला मिळत आहेत. उडीद, कापूस पिकाला देखील चांगला भाव मिळत आहे. तसेच त्याच्या दरात तेजीचे देखील संकेत आहेत. काही दिवसांपूर्वी 1/2 रुपये किलो इतका कमी भाव मिळालेला टोमॅटो शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकणे पसंत केले होते . मात्र आता एका क्रेटला टोमॅटोला 900 ते 1000 रुपये इतका भाव मिळतो आहे. मात्र सोयाबीनच्या दराची अवस्था जैसे थे आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे. मिळेल त्या भावाला सोयाबीन विकण्याची मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे.

काही प्रमुख बाजरातील सोयाबीनचे भाव (20-10-21)

–अहमदनगर – कोपरगाव- किमान 3800, कमाल 5153

— अहमदनगर- राहता – किमान 4800, कमाल 5276

–अकोला- किमान 4200, कमाल 4900 रुपये

–अमरावती- किमान 4200, कमाल 5400

–औरंगाबाद- किमान भाव 3900, कमाल 4881

— बीड-किमान 4400, कमाल 5140

–बुलढाणा-किमान 3500, कमाल 5000

–चंद्रपूर- किमान 3500, कमाल चार हजार 845

— जालना- किमान 3800, कमाल 4901

–लातूर- चाकूर- किमान 4030, कमाल 4850

— लातूर- उदगीर- किमान 5100, कमाल 5130

— लासलगाव- निफाड- किमान 3781, कमाल 5175

–लासलगाव- विंचूर- किमान 3000, कमाल 5103

–नागपूर -कटोल – किमान 2100, कमाल 4651