Success Story: शेतकर्‍याला मिळाली ‘राईस मिल आणि दालमिल’ जोड व्यवसायातून वर्षभर उत्पन्नाची हमी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी (Success Story) केवळ शेती व्यवसायावर (Farming) अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा (Agribusiness) करून अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत. असाच एक जोडधंदा गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील बेलगाव तालुक्याच्या शेतकऱ्याने (Shetkari Yashogatha) सुरू केला. या शेतकऱ्याने गावातच मिनी राईस मिल व दालमिल व्यवसाय (Mini Rice And Dal Mill Business) उभारला. या व्यवसायामुळे त्यांना हंगामासोबतच वर्षभर सुद्धा काही प्रमाणात आर्थिक लाभ (Success Story) मिळत आहे. त्यांच्या शेतीला त्यांनी एका चांगल्या व्यवसायाची जोड दिलेली आहे.

मिनी राईस मिल व दालमिल व्यवसाय  उभारणाऱ्या या शेतकऱ्याचे नवा आहे पसरराम रामदास कोठारे. पसरराम यांनी 2022-23 साली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा (PMFMPE) लाभ घेतला. यासाठी त्यांना बँकेकडून 5 लाख रूपयांचे कर्ज मंजूर झाले. या कर्जातून त्यांनी मिनी राईस मिल (Mini Rice Mill) व दालमिल संच उभारला. सध्या राईस मिलमध्ये बिघाड असून त्यांचा दालमिल व्यवसाय सुरू आहे (Success Story).

याशिवाय त्यांच्या कुटुंबातीलच एक भाऊ पीठ गिरणी व मिरची कांडप (गिरणी) चालवितात. त्यांच्या दालमिलवर मार्च महिन्यापासून डाळ भरडाईसाठी गर्दी असते. ही गर्दी संपूर्ण उन्हाळ्यात असते. पावसाळ्यात डाळ भरडाई होत नाही. त्यानंतर पुन्हा डाळ भरडाईला सुरुवात होते. गडचिरोली व धानोरा तालुक्याच्या अनेक गावांतील शेतकरी आपल्याकडील डाळी भरडाईसाठी बेलगाव येथे घेऊन येतात (Success Story).

35 टक्के अनुदान मिळणार
पसरराम रामदास कोठारे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेद्वारे जे 5 लाख रूपयांचे कर्ज मंजूर झाले यासाठी त्यांना 35 टक्के म्हणजेच 1 लाख 75 हजार रुपये अनुदान (Subsidy) मिळणार आहे. 

विविध प्रकारच्या डाळींची भरडाई
परसराम कोठारे हे तूर, पोपट, उडीद, मूग, हरभरा, मसूर, यासह विविध प्रकारच्या डाळी भरडून देतात. यासाठी प्रतिकिलो 3 रुपये भाडे ते घेतात. हंगामात एका दिवसात 20 क्विंटल डाळ भरडाई केली जाते. शेतकर्‍यांसह स्वत: सुद्धा ते डाळी भरडून विक्री करतात(Success Story).

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.