शेतकऱ्यांची अडचण दूर होणार ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यंदाचा मान्सून असमान राहिला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यात मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांसमोर पीक जगवण्याचं आणि दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं होतं. साधारणपणे जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं जोरदार हजेरी लावली होती. मात्र, त्याचवेळी उत्तर महाराष्ट्रात पावसानं दडी मारलेली होती. आता हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास शेतकऱ्यांसमोरील पाण्याची अडचण दूर होणार असे संकेत आहेत.

आज या भागात पाऊस लावेल हजेरी

हवामान विभागानं आज राज्यात ठिकठिकाणी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, लातूर, नांदेड , उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ के.ए.एस होसाळीकर यांनी दिली आहे. तर , राज्यात आज सकाळपासून जळगाव, नंदूरबार आणि औरंगाबाद दिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.

विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं सोमवारी परभणी जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, जळगाव, बुलडाणा, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

31 ऑगस्टला रायगड, ठाणे आणि नाशिकला अ‌ॅलर्ट

मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. तर, 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.