हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आठवड्यात राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी (Weather Update) पाहायला मिळत आहे. यात प्रामुख्याने बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे ईशान्येकडील राज्यांसह पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आजही कायम आहे. असे भारतीय हवामान शास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचा काही भाग, आंध्रप्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, हिमालयीन भागासह ईशान्येकडील राज्यांमध्ये आज पाऊस होऊ शकतो. असे हवामान विभागाने (Weather Update) आपल्या अंदाजात म्हटले आहे.
महाराष्ट्रात कशी असेल स्थिती? (Weather Update Today 22 March 2024)
मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेली चक्रीय वाऱ्यांची स्थिती (Weather Update) अजूनही कार्यरत आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात फारसा मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही. मात्र, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. परिणामी या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
कमाल तापमान वाढणार
पाच ते सहा दिवसांच्या पावसाच्या वातावरणानंतर सध्याच्या घडीला राज्यातील अनेक भागांमधून पावसाने काढता पाय घेतला आहे. मात्र पावसाचे वातावरण निवळल्याने राज्यात उष्णतेची ताप वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. ज्यामुळे आता पुन्हा राज्यात उन्हाचा तडाखा पाहायला मिळणार आहे.
35 अंशांहून अधिक तापमान
दरम्यान, मागील 24 तासांमध्ये राज्यातील सोलापूर या ठिकाणी राज्यातील उच्चांकी 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील नागपूर, रत्नागिरी हे दोन जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सध्या 35 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे.