हॅलो कृषी ऑनलाईन : अकोला जिल्ह्यात 25 ते 31 मे पर्यंत उष्णतेची लाट (Weather Update) येण्याची शक्यता आहे. उष्माघाचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात 31 मेपर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान, आज अकोल्यात 45.06 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना घराबाहेर पडणेही (Weather Update) मुश्किल झाले आहे
दोन्ही जिल्ह्यात पारा 45 अंशांपर (Weather Update Today 26 May 2024)
अकोला जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये तापमानाचा पारा 44 ते 45.8 अंश सेल्सियसपर्यंत (Weather Update) आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्यात 25 मे ते 3 जूनपर्यंत कलम 144 लागू असेल. उष्माघातामुळे होणारे बळी रोखण्यासाठी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. जळगाव आणि अकोला जिल्ह्यात उष्माघाताचे बळी रोखण्यासाठी जल्हाधिकाऱ्यांनी ही खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही जिल्ह्यातील तापमान 45 अंश सेल्सियसपर्यंत पोहल्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांसह सर्वांनाच, कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून काळजी घेण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
चक्रीवादळ आज धडकणार
असे असतानाच तिकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचे रुपांतर हे चक्रीवादळात (Weather Update) झाले आहे. या चक्रीवादळाला ‘रेमल’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा किनारपट्टीवर धडकू शकते. परिणामी काही भागांत वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी (ता.२६) पहाटे बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्यांचा ताशी वेग 100 ते 120 किमी प्रतितास असू शकतो, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
रेमल हे मान्सूनच्या आगमनानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले पहिले चक्रीवादळ आहे. आयएमडीचे मते, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या चक्रीवादळ ‘रेमाल’चे केंद्र खेपुपारापासून सुमारे 360 किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि सागर बेटाच्या 350 किमी दक्षिण-पूर्वेस आहे. या पार्श्वभूमीवर 26 ते 27 मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 27-28 मे रोजी ईशान्य भारतातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे.