हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील हवामानात सातत्याने (Weather Update) बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे उत्तर-पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे परिसरात कडक उन्हाची ताप पाहायला मिळत आहे. अशातच आता पुढील 24 तासांमध्ये राज्यासह देशातिल अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील 24 तासांत राज्यातील उर्वरित भागात हवामान कोरडे (Weather Update) राहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी (Weather Update Today 27 March 2024)
भारतीय हवामानशास्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, आज (ता.27) सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे. तर गुरुवारी (ता.28) नांदेड या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुढील 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
‘या’ राज्यांना इशारा कायम
पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये 31 मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. यात प्रामुख्याने 27 मार्च ते 31 मार्च या दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात जोरदार पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे. तर उत्तर-पूर्व भारतातील काही भागात वादळी वारा आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कमाल तापमानातील वाढ कायम
राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण कायम असताना, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांहून अधिक आहे. मागील 24 तासांमध्ये अकोला, वर्धा, अमरावती, मालेगाव, सोलापूर, यवतमाळ, परभणी या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंशाहून अधिक आहे. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 अंशाहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.