सोयाबीनला विक्रमी दर देणाऱ्या बाजार समितीत आता काय आहे अवस्था ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला विक्रमी 11 हजार 21 असा दर मिळाला होता. आज याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 हजार 600 ते 4 हजार 800 इतका दर मिळत आहे. हिंगोली येथे मुहुर्ताचा दर हा 11 हजाराचा मिळाला असला तरी किमान 8 ते 9 हजार क्विंटलचा दर शेतकऱ्यांना अपेक्षित होता. आज मात्र, सोयाबीनचा दर हा 5 हजारापेक्षा कमी झालेले आहेत. त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

काय आहेत सोयाबीनचे दर?

हंगामाच्या सुरवातीला म्हणजे सप्टेंबर महिन्यात हिंगोली येथे एका शेतकऱ्याच्या सोयाबीनला 11 हजार रुपये क्विंटलला दर मिळाला होता. या दराची चर्चा सबंध राज्यात झाली होती. शिवाय तीनच क्विंटल सोयाबीन एकंबा येथील शेतकऱ्याने बाजारात आणले होते. मात्र, भविष्यात सोयाबीनला चांगले दर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण सध्या हिंगोली बाजार समितीमध्ये सर्वात कमी दर मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कमाल दर हा 4 हजार 600 तर किमान दर 4 हजार 800 एवढा आहे. इतर बाजार समित्यांपेक्षा कमीचा दर हा हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमी दर मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीला विक्रमी दर देऊन सुरवात करणाऱ्या या बाजार समितीच्या दराची चर्चा आता मराठवाड्यात होत आहे.