पाऊस की ऊन कशी असेल राज्यातील आज हवामानाची स्थिती ? जाणून घ्या

Unseasonal Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल दिनांक २४ रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर काही भागात ढगाळ वातावरण कायम राहिले. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पावसाने हजेरी लावली तर राधानगरीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. राज्यात होत असलेल्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे राज्याच्या कमाल तापमान घट होत आहे. दरम्यान आज दिनांक २५ मार्च रोजी देखील कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या नागपूर शाखेने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 25 मार्च रोजी विदर्भातील काही भागात काही ठिकाणी तुरळक पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यामध्ये वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर विदर्भातल्या इतर भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर दिनांक 26 रोजी विदर्भामध्ये कोरड्या हवामानाची सूचना देण्यात आलेली आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 मार्च रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मध्ये तसेच गोवा कर्नाटक यासह काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सह पावसाची शक्यता आहे.