सावधान! येत्या 3-4 तासात राज्यातील ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता ; नाशिक आणि धुळे जिल्ह्यात तुफान गारपीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने दिलेल्या नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या तीन चार तासांमध्ये अहमदनगर, बीड ,सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर जात असाल तर खबरदारी घ्या अशी सूचनाही करण्यात आली आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या मुंबई विभागाकडून देण्यात आलेली आहे.

गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

दरम्यान राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातला शेतकरी चिंतेत आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा, कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर जागा द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बोपखेल आणि चरणमाळ घाटात प्रचंड गारपीट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

गावाचं झालं जम्मू-काश्मीर

नवापुर तालुक्यातील बोरझर, चरणमाळ, प्रतापपूर तसेच धुळे जिल्ह्यातील बोपखेल, वारसा ,उमरपाटा, कुडाशी ,मांजरी ,शेंदवड, नांदुरकी, पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गारपीट आणि पावसामुळे हिरावून गेलाय. रात्री एक ते दीड तास अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले कांदा गहू हरभरा भुईमूग ज्वारी या पिकांचे नुकसान झाल्यास गारपीट एवढ्या प्रमाणात झाली आहे की बोपखेल गाव हे जम्मू कश्मीर सारखं वाटू लागला होता तर संपूर्ण गावात बर्फाची पांढरी चादर बघायला मिळाली.

कोकणातही पावसाने आंबा -काजूचे नुकसान
तळकोकणातही चांगलाच पाऊस झाला आणि त्या ठिकाणीही गारपीट झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली कणकवली फोंडा परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला जवळपास अर्धा तास गडगडाटी पाऊस कोसळला या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकाला मोठा फटका बसला.