Farmers Loan : शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ होणार; राज्य सरकारचे बँकांना आदेश!

Farmers Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 1,60,000 पर्यंतच्या कर्जावरील (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना 500 रुपयांच्या स्टॅम्पऐवजी 1 रुपयांच्या तिकिटावर कर्ज मिळेल. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू असणार आहे. आणि नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लागू होईल. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि त्यांच्या कर्जावरील (Farmers Loan) खर्च कमी होईल. असे राज्य सरकारच्या वतीने सांगितले जात आहे.

संबंधित बॅंक शाखांना सरकारचे आदेश (Farmers Loan)

दरम्यान,यापूर्वी नव्याने पीक कर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता. शेतकऱ्यांना किमान 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क घेऊन नव्याने पीक कर्ज (Farmers Loan) घ्यायचे असल्यास संबंधित बॅंक शाखेत अर्ज करावा लागायचा. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी मुद्रांक शुल्क माफ केल्यानंतर, या निर्णयाच्या अंमलबजावणीची अनेक शेतकरी वाट पाहत होते. अखेर संबंधित बॅंक शाखांना राज्य सरकारकडून तसे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या कर्जाचे शुल्क माफ होणार?

ज्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ही मुद्रांक शुल्क माफी केवळ 1,60,000 लाखापर्यंतच्या कर्जावरच (Farmers Loan) लागू असणार आहे. 1 एप्रिल 2024 पासून नव्याने पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना हे मुद्रांक शुल्क माफ होणार आहे. परिणामी, आता कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. तर केवळ एक रुपयाच्या रेव्हनी तिकिटावर पीक कर्ज दिले जाईल. तसे आदेश बॅंकांना मिळाले आहेत. असल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.