Soybean Variety: सोयाबीनचे ‘हे’ वाण देते हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन, खरीपासाठी करू शकता लागवड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामासाठी जर तुम्ही सोयाबीनच्या कोणत्या वाणाची (Soybean Variety) लागवड करावी या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला असे वाण (Soybean Variety) सांगणार आहोत जे हेक्टरी 40 क्विंटल पर्यंत उत्पादन देते.

यंदा महाराष्ट्रात देखील सरासरी पेक्षा जास्त पाऊस होणार असा अंदाज वर्तविला (Weather Prediction) जात आहे. हवामान तज्ज्ञांनी यंदा मॉन्सून (Monsoon) वेळेआधीच दाखल होऊ शकतो असे म्हटले आहे. यामुळे यावर्षी खरीप सोयाबीन ( Kharif Soybean) लागवडी खालील क्षेत्र काहीसे वाढणार असा विश्वास आहे. जर सोयाबीन पि‍कातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक राहणार आहे.

सोयाबीन हे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागात घेतले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाला नगदी पिकाचा अर्थातच कॅश क्रॉपचा (Cash Crop) दर्जा मिळालेला आहे.

परंतु गेल्या दोन वर्षांपासून हे पीक शेतकर्‍यांना परवडत नाहीये. याचे कारण म्हणजे सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव (Soybean Rate) मिळत नाहीये आणि दुसरे म्हणजे सोयाबीन पि‍कातून पाहिजे तेवढे असे उत्पादन (Soybean Production) मिळत नाहीये. हेच कारण आहे की आज आपण सोयाबीनच्या विक्रमी उत्पादन देणार्‍या जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एन.आर.सी. 37 (अहिल्या – 4) (Soybean Variety)

NRC-37 ही जात (Soybean Variety) भारतात 2017 मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदौर येथून प्रसारित झाली आहे. तेव्हापासून ही जात सोयाबीन उत्पादकांमध्ये (Soybean Producer)  खूपच लोकप्रिय आहे. कारण की या जातीपासून शेतकर्‍यांना अधिकचे उत्पादन मिळत आहे. कृषी संशोधकांनी या जातीपासून शेतकर्‍यांना हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन (Soybean Yield) मिळू शकते असा दावा केला आहे. विशेष म्हणजे ही जात आपल्या महाराष्ट्रात लागवडीसाठी अनुकूल आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांत या जातीची शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे (Soybean Variety) पीक 96 ते 102 दिवसांत परिपक्व होत असल्याची माहिती कृषी संशोधकांनी दिली आहे.