हॅलो कृषी ऑनलाईन: राजस्थान (Farmers Success Story) म्हटले तर आपल्या डोळ्यासमोर येतेरखरखीत हवामान आणि वाळवंट. मर्यादित पाऊस यामुळे राजस्थानच्या शेतीत भरपूर आव्हाने आहेत. तीव्र तापमान आणि विरळ पावसामुळे या प्रदेशात पिकांची लागवड करणे कठीण काम आहे. तथापि, या अडथळ्यांना न जुमानता, कलख गाव, फुलेरा, जयपूर येथील गंगा राम सेपत सारख्या कल्पक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती (Organic Farming) स्वीकारली आणि त्यातून 40 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवत आहे. एवढेच नाही तर काकडी लागवडीसाठी (Cucumber Farming) राष्ट्रीय स्तरावर त्यांना ‘भारतीय करोडपती फलोत्पादक शेतकरी’ हा सन्मान सुद्धा मिळाला आहे. चला जाणून घेऊ या शेतकऱ्याची यशोगाथा (Farmers Success Story).
सेंद्रिय शेतीच्या दिशेने पहिले पाऊल (Farmers Success Story)
पूर्वी एक एक खाजगी शाळा चालवणाऱ्या गंगा राम सेपत यांनी एकदा कर्करोगाच्या वाढत्या घटनांबद्दलच्या चिंताजनक अहवाल वाचला. अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आले की शेतीत वापरण्यात येणारी रसायने याचे मूळ कारण आहे. याच काळात त्यांच्या सासऱ्यांना कर्करोग झाला आणि त्यांचा या रोगाशी लढतांना होणारा त्रास गंगा राम सेपत यांनी जवळून पाहिला. तेव्हा सेपत यांना सेंद्रिय शेतीचे महत्व कळले आणि त्यांच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून ते सेंद्रिय शेतीकडे वळले (Farmers Success Story).
2012 मध्ये गंगा राम सेपत यांनी सेंद्रिय शेती सुरू केली, या निर्णयाने त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला. 2018 पर्यंत त्याने अधिकृतपणे त्याच्या या सेंद्रिय शेती उपक्रमाची नोंदणी सुद्धा केली.
शेतीचे तंत्र आणि जलसंधारण धोरण
गंगा राम यांच्याकडे अंदाजे 4 हेक्टर जमीन आहे, जिथे ते कमीतकमी कीटकनाशकांचा वापर करून पॉलीहाऊसमध्ये (Polyhouse) काकडीची लागवड करतात. यासाठी जैविक कीटकनाशक (Biological Pesticides) आणि स्यूडोमोनास आणि ट्रायकोडर्मा (Trichoderma) यांसारखी जैविक संवर्धन आणि बीओवेरिया बेसियाना आणि मेटारिझियम एनिसोप्ली सारख्या बायोएजंट्सच्या मदतीने पिकाचे संरक्षक (Crop Protection) करतात.
ब्रोकोली, लेट्युस, चायना कोबी आणि लाल कोबी यांसारख्या विदेशी भाज्यांची (Exotic Vegetables) लागवड करून त्याच्या पिकांमध्ये विविधता आणली आहे (Farmers Success Story).
गावात पाण्याची टंचाई असल्यामुळे हे आव्हान पेलण्यासाठी त्यांनी 1 कोटी लिटर पाणी साठवू शकणारे शेततळे बांधले. सिंचनासाठी, ठिबक सिंचन पद्धतीची निवड केली आहे. शेतात स्प्रिंकलर प्रणालीचा वापर ते कमी प्रमाणात करतात.
समुदाय सहयोग आणि सरकारी समर्थन
गंगा राम हे कलाखाग्रो नवफेड शेतकरी उत्पादक लिमिटेड कंपनीचे सक्रीय सदस्य आहेत. ज्यात अंदाजे 350 शेतकरी आहेत. त्यांनी एकत्रितपणे FPO द्वारे पीक संरक्षण उपाय आणि बायोकल्चर्स आणि बियाणे यांसारखे इनपुट देणारे दुकान स्थापन केले आहे. गंगा राम सेपट यांनी शेत तलाव आणि पॉलीहाऊस या दोन्हीसाठी सरकारी अनुदानाचा (Government Subsidy) लाभ घेतला आहे.
इतर शेतकरी आणि त्यांनी मिळून सुमारे 1500 पॉली हाऊसची निर्मिती जे “मिनी इस्रायल” म्हणून ओळखले जाते (Farmers Success Story).
मत्स्यपालन आणि पशुधन एकत्रित करणे
सेपट एकात्मिक शेतीसोबतच मत्स्यपालन (Fish Farming) आणि पशुपालन व्यवसाय सुद्धा करतात. माशांचा कचरा ते नैसर्गिक खत म्हणून वापरतात. यामुळे माती समृद्ध होऊन पिकांची चांगली वाढ होते असे ते सांगतात. इतर शेतकरी आणि त्यांनी मिळून सुमारे 1500 पॉली हाऊसची निर्मिती जे “मिनी इस्रायल” म्हणून ओळखले जाते. शेतीत नवे प्रयोग आणि पारंपरिक शेती यांची सांगड घालून गंगा राम यांनी केलेली शेती (Farmers Success Story) खरच कौतुकास्पद आहे.