Drought In Maharashtra : शेतकरी मेटाकुटीला, कृषीमंत्री परदेशवारीला; वडेट्टीवारांची मुंडेंवर सडकून टीका!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या कृषिमंत्र्यांना सत्तेची मस्ती (Drought In Maharashtra) आली आहे. अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात दुष्काळाचे संकट असताना कृषीमंत्री परदेशात कसे जाऊ शकतात? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील नेते टक्केवारी घेण्यात व्यस्त आहेत आणि शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे (Drought In Maharashtra) काम सूरू आहे. असा आरोपही वडेट्टीवारांनी केला आहे.

75 टक्के भागात भीषण परिस्थिती (Drought In Maharashtra)

राज्यात दुष्काळाची (Drought In Maharashtra) तीव्रता प्रचंड आहे. अनेक भागात 15 ते 20 दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील 75 टक्के भागात कोरडा दुष्काळ असून, परिस्थिती अत्यंत भयावह आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. मात्र, दुष्काळ आढावा बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडेच गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले. यावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली आहे. राज्यात दुष्काळाचे संकट असताना कृषीमंत्री परदेशात कसे जाऊ शकतात? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.

आढावा बैठकीला पालकमंत्री गैरहजर

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार छत्रपती संभाजीनगर, जालना, जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त (Drought In Maharashtra) भागाचा दौरा केला त्यावेळी ते बोलत होते. प्रामुख्याने कृषिमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा परिस्थितीत मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकारमधील मंत्री त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित दुष्काळ आढावा बैठकीला पाच पालकमंत्री गैरहजर राहतात. यातूनच त्यांची दुर्लक्ष वृत्ती दिसून येते. हे सरकार टक्केवारी खाणारे आहे. असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.

‘शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज’

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही सरकारला दुष्काळ परिस्थितीवरुन घेरले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सरकार दुष्काळाबाबत गंभीर असून, त्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. राज्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जटील प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारने तातडीने दुष्काळी उपाययोजना करून, राज्यातील दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. असे अंबादास दानवेंनी म्हटले आहे.

error: Content is protected !!