Farmers Success Story: डोंगरावरून विना लाईट पाणी आणून हा शेतकरी करतोय शेती! जाणून घ्या यशाची कहाणी  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीत वि‍जेची उपलब्धता हे भारतीय शेतकर्‍यांसाठी (Farmers Success Story) फार महत्त्वाचा विषय आहे. शेतीला वेळेवर वीज (Electricity For Agriculture) उपलब्ध झाली नाही तर शेतकर्‍यांना (Farmers) वेगवेगळ्या समस्येला सामोरा जावे लागते. सर्वात मोठी समस्या असते वि‍जेशिवाय शेतीला पाणी (Irrigation For Farming) कसे देणार याची.  पण आज आपण अशा शेतकर्‍याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने वि‍जेशिवाय डोंगरावरून दीड किलोमीटर शेतात पाणी आणलं (Farmers Success Story).   

मागील वर्षी पाऊस (Rain) कमी झाल्याने ऐन उन्हाळ्यात रब्बी पिकांना पाणी न मिळाल्याने शेतकर्‍यांना फटका बसला. नाशिक जिल्ह्यातील (Nashik) बहुतांश भागात अशीच परिस्थिती अनुभवास मिळाली. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या त्र्यंबकेश्वर-इगतपुरी (Trimbakeshwer) तालुक्यात देखील भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला. शिवाय रब्बीच्या अनेक पिकांचे नुकसान झाले. तसेच दरवर्षी या भागात येथील शेतकरी असो, नागरिक असो सर्वांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

मात्र तालुक्यातील शेवगेडांग येथील शेतकरी मधुकर मंगा खंडवी (Madhukar Khandavi) यांनी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झिऱ्याला मूर्त स्वरूप देत विहीर तयार केली. आज बाराही महिने या विहिरीला पाणी असून थेट दीड किलोमीटर शेतात पाणी आणलं (Farmers Success Story) आहे.

 इगतपुरी- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर शेवगेडांग (Shevgedang) हे गाव लागते. याच गावाला लागूनच वैतरणा धरण आहे. शेवगेडांग गावाला लागूनच असलेल्या वाडीजवळ खंडवी यांची शेती आहे. मात्र शेतीच्या वरील बाजूस साधारण दीड किलोमीटर अंतरावर आठव्याचा डोंगर उभा आहे. दाट जंगलाचा भाग असून या डोंगराच्या पोटाला लागूनच खंडवी यांची शेती सुरू होते. याच ठिकाणी खंडवी हे माध्यमिक शाळा शिकत असताना त्यांना हा झिरा दृष्टीस पडला. कालांतराने या झिऱ्याला जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आले. आणि आश्चर्य काय झिऱ्याला चांगलं पाणी असल्याचे दिसून आले (Farmers Success Story). 

विहिरीतून पाणी शेतात कसं नेलं?

शेतकरी खंडवी यांनी जेसीबीने खोदल्यानंतर चांगलं पाणी लागल्याचे समोर आले. त्यामुळे शिवाय अनेक भागातून विहिरीत पाणी पाझरत असल्याचे दिसले. म्हणूनच विहीर बाराही महिने काठोकाठ भरलेली असते. ही विहीर जवळपास दीड परस खोल असून विहिरीच्या मध्यभागी एक पाईप टाकण्यात आला. हा पाईप पुढे शंभर पावलावर बाहेर काढत तिथे दोन स्वतंत्र कॉक काढण्यात आले. उतार असल्याने हे पाणी सलग खाली जाते. शंभर पावलावर असलेल्या दोन कॉक पैकी एका कॉकच्या माध्यमातून पुढे आठशे मीटरवर असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडले जाते. त्यानंतर पुढे उभारलेल्या पोल्ट्री फार्मला (Poultry farming) पुरवले जाते. तर एक कॉक शेतीच्या पाण्यासाठी तयार केला आहे (Farmers Success Story). 

स्वतंत्र आरओ प्लांटची उभारणी 

खंडवी यांनी पाणी थेट खाली आणल्यानंतर ते पोल्ट्री व्यवसाय देखील करत आहेत. मात्र दूषित पाण्यामुळे कोंबड्याचे मृत्यूचे प्रमाण वाढत होते. म्हणून त्यांनी स्वतंत्र आरओ प्लांट उभारणी केली. या आरओ प्लांटच्या माध्यमातून कोंबड्याना शुद्ध  पाणी पुरवठा होऊ लागला. त्यामुळे कोंबड्याचे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. शिवाय आजारांचे प्रमाणही घेतले. पाण्याच्या टाकीतून पाणी थेट आरओ प्लांट मध्ये सोडले जाते. या ठिकाणी पाण्याचे निर्जंतुकीकरण होऊन ते पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याना दिले जाते (Farmers Success Story). 

कधीकधी निसर्ग सुद्धा मानवाला किती सहाय्यक ठरू शकतो हे या यशोगाथेतून (Shetkari Yashogatha) लक्षात येते.