राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज ; पहा कुठे कशी असेल पावसाची स्थिती

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानं पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दिलासा मिळाला सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी तीन ते नऊ सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान ३ सप्टेंबर रोजी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे राज्यात येत्या पाच दिवसात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मुसळधार तर कोकणात 6,7 सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

26 ऑगस्ट 1 सप्टेंबर या कालावधीत पडलेल्या सरासरी पावसाचा विचार करता धुळे जळगाव नगर सोलापूर मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड लातूर उस्मानाबाद कोकणातील पालघर सहा मुंबई आणि उपनगरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला धुळे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या तुलनेत 260 टक्के अधिक पाऊस पडला.

सातत्याने पडणारे खंड कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस आणि असमान वितरण हे यंदाच्या मान्सून हंगामा चे वैशिष्ट्य ठरले आहे. ऑगस्ट महिन्यातील अपुऱ्या पावसानंतर चिंतित आणखीन भर घातली आहे. आता मान्सूनच्या उर्वरित हंगामात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर विदर्भाचा बहुतांशी भाग दक्षिण कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडला.