काळजी घ्या …! राज्यात उन्हाचा चटका वाढणार

Heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये सध्या पहाटेच्या वेळी थंडी आणि दिवसभर चटका बसणारे ऊन… अशी स्थिती पाहायला मिळत आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील ही तफावत कायम आहे. रविवारी दिनांक 6 रोजी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 5.4 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. तर सोलापूर येथे उच्चांकी 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाचा चटका वाढण्याबरोबरच गारठा कमी होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी आणि धुकं मात्र कायम आहे. रविवार दिनांक 6 रोजी हरियाणातील हिस्सार इथं देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 1.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उत्तर महाराष्ट्रात निफाड, धुळे, जळगाव, नाशिक आणि विदर्भातील गोंदिया नागपूर वगळता राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या वर गेला आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील कमाल तापमान

दिनांक 6 फेब्रुवारी रोजी राज्याच्या काही भागात 30 अंशावर कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे. सांताक्रुज 32.5, पुणे 32.2, जळगाव 31.8, नाशिक 31.5, सांगली 32.9, सातारा 21.7, कोल्हापूर 32.8, सोलापूर 33.8 आणि ठाणे 32 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान रविवारी नोंदवण्यात आला आहे.