हॅलो कृषी ऑनलाईन: लातूर जिल्ह्यातील विशाल माले या शेतकर्याने (Farmers Success Story) फुलशेती (Flower Farming) सोबतच पेरू (Guava Farming) आणि आंबा (Mango Farming) लागवडीतून शेतीला शाश्वत उत्पन्नाचे स्वरूप (Farmers Success Story) प्राप्त करून दिले आहे.
तीन दशकांहून अधिक काळ, महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुका गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. या पाणी टंचाईने स्थानिक शेतकर्यांना हंगामी आणि त्यातल्या त्यात एकच पीक (Mono Cropping) घेण्यास भाग पाडले. मर्यादित ज्ञान आणि जोखीम नकोच या विचाराने शेतकरी नैसर्गिक शेती आणि कृषी वनीकरण यासारख्या अधिक शाश्वत आणि फायदेशीर शेती पद्धतींचा अवलंब करण्यास संकोच करत होते.
परंतु आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नैसर्गिक शेतीच्या (Art Of Living Farming) एका उपक्रमाने शेतकर्यांना फायदेशीर नैसर्गिक शेतीसाठी ज्ञान आणि संसाधन मिळाले. औसा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी विशाल माले यांना या उपक्रमाचा फायदा झाला असून त्यांना या उपक्रमातून पेरू आणि आंब्याची झाडे लावण्याचे प्रशिक्षण व सहकार्य मिळाले आहे. त्यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या जमिनीतूनच त्यांनी वेगवेगळी पिके (Crop Diversification) घेऊन शेती नफ्यात लक्षणीय वाढ केली.
विशाल सांगतात या उपक्रमाद्वारे त्यांना 600 पेरुची झाडे आणि 50 आंब्याची झाडे मिळाली तसेच शेतीसाठी नैसर्गिक सामग्री कशी बनवायची याचे प्रशिक्षण सुद्धा त्यांना मिळाले.
विशाल माले सांगतात, “आता मी फक्त 1.25 एकर बागेतून दरवर्षी सुमारे 3 लाख रुपये कमावतो. मी सुरुवातीला फारसा उत्सुक नव्हतो कारण उत्पादन चांगले येण्यासाठी वेळ लागतो असे मला वाटले, पण मी पेरू आणि आंबा लावण्यासाठी पाऊल उचलले आणि आता मला वाटते की हा सर्वोत्तम निर्णय होता,”
एक पीक लागवडीतून बहुपीक पद्धतीकडे वाटचाल (Farmers Success Story)
26 वर्षीय विशाल सात सदस्यांच्या कुटुंबात राहतो. हवामानातील अनिश्चितता आणि प्रदीर्घ दुष्काळामुळे त्यांच्या भागातील शेतकरी फक्त हंगामी पिके घेतात आणि ज्यांना पाणी उपलब्ध आहे ते शेतकरी ऊस पिकवतात कारण त्याला जास्त मागणी आहे असे त्यांनी पाहीले आहे.
विशाल म्हणतो, ‘माझा फुलांचा व्यवसाय वर्षभर सुरू असला तरी माझ्या गावात अजूनही असे शेतकरी आहेत जे फक्त हंगामी पिके घेतात आणि बाकीच्या वेळी त्यांच्याकडे फारसे काम नसते.’
माझी परिस्थिती बदलली आहे, आज माझ्याकडे वर्षभर चालणारा फुलांचा व्यवसाय आहे. यातून मिळालेल्या अतिरिक्त पैशामुळे माझ्या धाकट्या भावाला चांगले शिक्षण देणार आहे. मी यापूर्वी कर्ज घेतले आहे, परंतु अतिरिक्त उत्पन्न मिळाल्यानंतर भविष्यात कर्जाची गरज भासणार नाही,’ असेही विशाल सांगतो (Farmers Success Story).
विशालचे वडील बालाजी माले सांगतात, “आमच्या शेतात पेरू आणि आंब्याची झाडे आहेत त्याला 2 वर्षे झाली आहेत. त्याआधी आमचे पणजोबा असल्यापासून आम्ही फक्त फुलशेती करत आलो आहोत. प्रत्येक शेतकर्याने नवनवीन गोष्टी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, झाडांना जास्त देखभाल आणि गुंतवणूकीची आवश्यकता नसते, म्हणून माझ्यासारखा कोणताही शेतकरी ते सहजपणे वाढवू शकतो आणि फायदे मिळवू शकतो”.
आर्ट ऑफ लिव्हिंग च्या नैसर्गिक शेती (Natural Farming) प्रशिक्षकांनी विशालला घरच्या घरी निविष्ठे कशी बनवायची, पेरू कसा वाढवायचा, त्याची देखभाल कशी करायची, त्याची पाण्याची गरज आणि पेरू फायदेशीर आणि परिणामकारक कसा असू शकतो याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षकांनी त्याच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी यशस्वी कामाचे मॉडेल दाखवले. त्याला वेगवेगळ्या नैसर्गिक निविष्ठांच्या वापरा द्वारे सूक्ष्मजीवांचे प्रमाण आणि कार्बन, नायट्रोजन आणि फॉस्फरस वाढवण्याचे तंत्र शिकवण्यात आले.
प्रशिक्षणामुळे त्यांच्या लक्षात आले जमिनीचा प्रभावी वापर करून ते 2-3 लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. त्यांचे कुटुंब पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे केवळ फुलांची शेती करत होते, परंतु प्रशिक्षणामुळे त्यांना शेतीत विविधता आणता आली. जमिनीला अनेक पौष्टिक गरजा असतात आणि विविध पीक पद्धती या गरजा पूर्ण करण्यास मदत करतात याची जाणीव त्यांना करून देण्यात आली.
मातीची धूप, खालावलेली जमिनीची सुपीकता, दूषित भूजल आणि पाण्याचा अपव्यय यासारख्या समस्या एक पीक पद्धतीचे दुष्परिणाम दर्शविते. यामुळे बहु-पीक, नैसर्गिक शेती आणि कृषी वनीकरण मॉडेल्सकडे जाण्याकडे शेतकर्यांमध्ये स्पष्ट बदल आणि कल दिसून आला आहे. खरतर ही आपली प्राचीन पद्धतीच आहे, जी परत आपल्याला आपल्या मुळांकडे नेत आहे. रसायनांच्या आगमनाने नैसर्गिक शेती काळाच्या ओघात लुप्त झाली, आता तिचे पुनरुज्जीवन सुरू आहे.
“मी सर्व शेतकर्यांना एका पिकावरील अवलंबित्व सोडण्याची विनंती करेन. विशेषतः औसा येथे शेतकरी फक्त पावसाळी पिके घेतात. कृषी वनीकरण आपल्याला अधिक स्वावलंबी आणि सक्षम करेल. मी अतिरिक्त कमावलेल्या या 3 लाखांनी माझी जीवनशैली बदलली आहे आणि मी आता माझ्या कुटुंबासाठी अधिक चांगला विचार करू शकतो.” असे विशाल सांगतो (Farmers Success Story).