Guava Farming : ‘हा’ आहे राज्यातील पेरूचा तालुका; जेथील शेतकरी पेरूतून होतायेत मालामाल!

Guava Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात असा बराचसा भाग आहे. ज्या ठिकाणी पिकणाऱ्या विशिष्ट पिकाच्या (Guava Farming) उत्पादनामुळे संबंधित भाग ओळखला जातो. विशेष म्हणजे पूर्वी घरासमोर, विहिरीच्या कडेला, शेताच्या बांधावर पेरूची झाडे हमखास दिसायची. मात्र, आता याच पेरूच्या बागा चांगल्याच फुलताना दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका सध्या ‘पेरूचा तालुका’ म्हणून आपली ओळख निर्माण करताना दिसून येत आहे. तालुक्यातील जवळपास ९१ गावांमध्ये मागील ५ वर्षांमध्ये पेरूच्या पीक (Guava Farming) लागवडीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

91 गावांमध्ये पेरूची लागवड (Guava Farming)

वातावरणातील बदलामुळे द्राक्ष, डाळिंब या पिकांचे उत्पादन घेण्यास मर्यादा आल्या आहेत. ज्यामुळे आता या पिकांऐवजी शेतकरी कोणत्याही जमिनीत, हवामानात येणारे, हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी पर्यायी पिकाकडे वळताना दिसत आहेत. ही गरज ओळखून सध्या इंदापूर तालुक्यातील १४० गावांपैकी ९१ गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पेरूची लागवड (Guava Farming) केली जात आहे. विशेष म्हणजे इंदापूर तालुक्यात २०१९-२० मध्ये ३५६ हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येणारे पेरूचे पीक सध्या २०२३-२४ मध्ये २ हजार ४४९.५ हेक्टरपर्यंत विस्तारले आहे. ज्यामुळे तालुक्याची ओळख पेरूचा तालुका अशी बनली आहे.

वर्षनिहाय पेरू लागवडीत झालेली वाढ

इंदापूर तालुक्यात प्रामुख्याने वरकुटे खुर्द (२०० हेक्टर), पिटकेश्वर (१९९ हेक्टर), शेळगाव (१९० हेक्टर), निमगाव केतकी (१२० हेक्टर) ही पेरूची लागवड (Guava Farming) करणारी महत्त्वाची गावे आहेत. तर वर्षनिहाय आकडेवारीनुसार, तालुक्यात २०१९-२० मध्ये (३५६ हेक्टर), २०२०-२१ मध्ये (४७७ हेक्टर), २०२१-२२ मध्ये (८९६ हेक्टर), २०२२-२३ मध्ये (१०४७ हेक्टर), २०२३-२४ मध्ये (२४४९.५ हेक्टर) पर्यंत पेरू लागवड वाढली आहे.

तीनही हंगामात भरघोस उत्पन्न

समशीतोष्ण हवामान असणाऱ्या भागात पेरूचा उन्हाळी, पावसाळी व हिवाळी हंगाम धरला जातो. ज्यामुळे तीनही हंगामात भरघोस उत्पन्न मिळते. पेरूच्या वेगवेगळ्या जाती व टिकवण क्षमता यामुळे इंदापूरचा पेरू सध्या देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत ही जाऊ लागलेला आहे. तालुक्यात सद्यःस्थितीत पेरूच्या बागांच्या छाटण्या आटोपल्या आहेत. बऱ्याचशा बागा फुटण्याच्या व कळीच्या अवस्थेत आहेत. यंदाच्या हंगामात पेरूच्या झाडांना फळे चांगली लगडलेली राहतील. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.