Kharif Crop Seeds : परभणी विद्यापीठाची बियाणे विक्री सुरु, शेतकऱ्यांचा खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद!

Kharif Crop Seeds For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बियाणे खरेदी हा खरीप (Kharif Crop Seeds) हंगामाच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा असतो. यावर्षी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसित सोयाबीन, तूर, ज्वारी आणि मुगाचे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रथम पसंती दिली आहे. 18 मे पासून 52 व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून ही बियाणे विक्री सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या परभणी येथे विद्यापीठाकडून आयोजित 52 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासह महाराष्ट्रातून जवळपास 5000 शेतकऱ्यांनी सहभागी नोंदविला आणि यापैकी 1800 शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी (Kharif Crop Seeds) केले आहे.

‘या’ वाणांची होतीये विक्री (Kharif Crop Seeds For Farmers)

यात प्रामुख्याने बियाणे विक्रीच्या (Kharif Crop Seeds) पहिल्या दिवशी (ता.18) 1800 शेतकऱ्यांनी खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्यांनी एकूण 418.26 क्विंटल बियाणे खरेदी केले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे (ता.20)
196.52 क्विंटल बियाण्याची खरेदी केली आणि तिसऱ्या दिवशी (ता.21) 563.22 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध होते. यामध्ये सोयाबीन पिकाचे एमएयुएस 158 आणि एमएयुएस 162 हे वाण उपलब्ध असून, तुरीच्या बीडीएन-13-41 (गोदावरी), ज्वारीचा परभणी शक्ती आणि मुगाचा बीएम 2003-2 या वाणाचा समावेश आहे.

सत्‍यतादर्शक बियाणे उपलब्ध

विद्यापीठाद्वारे यावर्षी प्रथमच 1178 क्विंटल खरीप पिकांचे सत्‍यतादर्शक बियाणे (7957 बॅग) उपलब्ध करून देण्यात आलेले होते. विद्यापीठाची परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्राची जमीन पेरणी योग्य केल्यामुळे बीजोत्‍पादनात वाढ झाली आहे. कृषि विद्यापीठाने मूलभूत आणि पैदासकार बियाणे उत्पादित करून, त्याचा पुरवठा महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांना करावा. जेणेकरून या कंपन्या मूलभूत आणि पैदासकार बियाण्यांपासून पायाभूत व प्रमाणित बियाणे उत्पादित करून त्याचा शेतकऱ्यांना पुरवठा करतील, या पद्धतीने विद्यापीठाची बियाणे विक्री केली जाते.

सोयाबीनचे 13 वाण विकसित

विद्यापीठाने आजपर्यंत सोयाबीनचे 13 वाण विकसित केलेले असून, मराठवाड्यामध्ये विद्यापीठाच्या सोयाबीनच्या वाणाखाली 40 ते 50 टक्के क्षेत्र आहे. तर तुरीचा बीडीएन-711 या अतिशय नावाजलेल्या वाणाची 50 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली जाते. शेतकऱ्यांना अधिकाधिक बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्नशील आहे. याकरिता विद्यापीठाने 262 महाबीजसह इतर बियाणे कंपन्या आणि शेतकरी उत्पादक कंपन्यासोबत सामंजस्य करार केलेले आहेत. असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.