हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिके घेताना वीज, पाणी या गोष्टींची (Onion Farming) खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. मात्र, भर सिझनला पाणी उपलब्ध असते. तर योग्य त्या प्रमाणात वीज मिळत नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ज्याचा थेट परिणाम हा त्यांच्या पिकांच्या उत्पादनावर होत असतो. ज्यामुळे अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने आपल्या विहिरीवर सौरऊर्जेवरील दोन कृषी पंप बसवले आहेत. इतकेच नाही नियमित कांदा पिकाला (Onion Farming) नियमित पाणी मिळाल्याने त्याद्वारे आर्थिक प्रगती साधणाऱ्या या शेतकऱ्याची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत.
विजेच्या लपंडावापासून सुटका (Onion Farming Record Yield)
भाऊसाहेब उबाळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते अहमदनगरच्या श्रीगोंदे तालुक्यातील आढळगाव रहिवासी (Onion Farming) आहेत. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनाही आपल्या शेतीमध्ये विजेचा लपंडावाचा सामना करावा लागत होता. परिणामी, विजेच्या ये-जा करण्यामुळे वैतागलेल्या शेतकरी भाऊसाहेब उबाळे यांनी आपल्या विहिरीवर तीन एचपीचे दोन कृषी पंप बसवून घेतले. ज्यामुळे त्यांना विजेच्या लपंडावापासून कायमची मुक्ती मिळवली आहे. तसेच सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपावर त्यांनी यंदा जवळपास साडेपाच एकर कांदा पिकवला आहे.
किती मिळाले उत्पन्न?
भाऊसाहेब उबाळे यांची एकूण 13 एकर जमीन असून, यामध्ये त्यांचा आठ एकर ऊस, पाच एकर कांदा लागवड (Onion Farming) केली आहे. यंदा त्यांना उस पिकातून 12 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय कांदा पिकाला देखील यंदा वेळेवर पाणी मिळाले. ज्यामुळे त्यांचे कांद्याचे पीक देखील जोमदार आले आहे. वेळेवर पाणी मिळाल्याने साडेपाच एकरात 1 हजार 750 गोणी कांदा निघाला आहे. यामधून सध्याच्या बाजारभावानुसार, त्यांना 11 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले असल्याचे ते सांगतात.
किती मिळाला कांद्यातून नफा?
शेतकरी भाऊसाहेब उबाळे सांगतात, सौरऊर्जा कृषीपंपामुळे कांदा पिकाला पाणी वेळेवर मिळाले. त्यामुळे एका कांद्याचे वजन सरासरी दोनशे ग्रॅम झाले. कलरही चांगला आला. सध्या कांद्याचे भाव कोसळले असले तरी कांद्याचे एकरी उत्पादन चांगले निघाल्याने एकरी दोन लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. खर्च वजा जाता साधारण पाच ते सहा लाखांचा नफा त्यांना झाला आहे. विजेच्या लपंडावामुळे कृषी पंप चालत नाही. पिकाला वेळेवर पाणी मिळाले नाही की उत्पादनात घट होते. परिणामी, शेतीचे नफा-तोट्याचे समीकरण बिघडते. मात्र, यंदा सौरऊर्जा कृषीपंपामुळे चांगले उत्पन्न मिळाले आहे.