सांगली, कोल्हापूर , सिंधुदुर्ग भागाला अवकाळीने झोडपले ; पहा आज कुठे लावणार पाऊस हजेरी ?

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याच्या हवामानाचा विचार केला तर राज्यामध्ये काही भागांमध्ये अवकाळी पाऊस तर काही भागांमध्ये उन्हाचा चटका अशी स्थिती नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. विदर्भात उन्हाचा पारा वाढला आहे. तर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी दिनांक 5 एप्रिल रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर सिंधुदुर्ग या भागांमध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिटीचा पाऊसही झाला आहे त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची ही एकच तारांबळ उडाली. दरम्यान आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी तापमान चढेच राहणार आहेत तर काही ठिकाणी विजासह पाऊस हजेरी लावणार आहे.

दिनांक 5 एप्रिल रोजी सांगली शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर मिरज आणि तालुक्यातील पूर्व भागात 6 अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला आहे. सदा रब्बी पिकांची शेतामध्ये काढणे सुरुवात या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या कामाचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली मिरज भागांमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज दिनांक 6 एप्रिल रोजी अमरावती, अकोला आणि बुलढाणा या भागात तापमान चढेच राहील यासाठी उष्णतेचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तर राज्यातील रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

कुठे किती तापमान ?
राज्याच्या काही भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा मात्र खाली उतरायचं नाव घेत नाहीये. दिनांक 5 एप्रिल रोजी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार अकोला येथे सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. तर बुलढाणा येथे 41.2 ,ब्रह्मपुरी 41 पॉइंट 4, गोंदिया 41.5, नागपूर 41.5 आणि वर्धा 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद 40 पॉइंट 6, परभणी 42 पॉईंट चार, नांदेड 41.2, मुंबई सांताक्रुज 33.8 ,अलिबाग 34.2, रत्नागिरी 32.5, पुणे 39.3, लोहगाव 40.2 ,अहमदनगर 42.6, जळगाव 44, अंश सेल्सिअस महाबळेश्वर 32.8, मालेगाव 42.6 ,नाशिक 39.4, सांगली 37.9, सातारा 38.5 ,आणि सोलापुरात 41 सेल्सिअस तापमानाची नोंद दिनांक 5 एप्रिल रोजी करण्यात आली आहे.