Soyabean Sowing : सोयाबीन पेरणीसाठी ‘या’ सूचनांचे पालन करा; मिळेल भरघोस उत्पादन!

Soyabean Sowing In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात सोयाबीनचे चांगले उत्पादन (Soyabean Sowing) घेण्यासाठी भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. संस्थेने शेतकऱ्यांना उन्हाळ्यात 3 वर्षांतून एकदाच खोल नांगरणी करण्याचा आणि सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, संस्थेने शेतकऱ्यांना एकाच वेळी 2 ते 3 सोयाबीनच्या वाणांची लागवड करण्याचा आणि योग्य अंतर राखून पेरणी (Soyabean Sowing) करण्याचा सल्ला दिला आहे.

संस्थेच्या महत्वपूर्ण सूचना (Soyabean Sowing In Maharashtra)

शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीसाठीची (Soyabean Sowing) जमीन उन्हाळ्यात 3 वर्षांतून एकदाच खोल नांगरणी करावी. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील माती क्रॉस पॅटर्नमध्ये नांगरून माती समतल करावी. तसेच पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी 5 ते 10 टन कुजलेले खत किंवा 2.5 टन कोंबडी खत वापरावे. याशिवाय 5 वर्षांतून एकदा सब-सॉयलर मशिन वापरून जमिनीचा खोल थर फोडावा.

कशी कराल लागवड?

दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी दरम्यान शिफारस केलेले बियाणे रांगेत 45 सेंटीमीटर आणि एका रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंत 5 ते 10 सेंटीमीटर अंतर ठेऊन लागवड करावी. तर पेरणीसाठी साधारणपणे प्रति हेक्टर 60 ते 75 किलो बियाणे वापरावे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी एकाच वेळी 2 ते 3 सोयाबीनच्या वाणांची लागवड करावी. असे आवाहनही सोयाबीन संशोधन संस्थेने केले आहे.

शेतकऱ्यांना कसा फायदा होणार

सोयाबीन संशोधन संस्थेच्या वरील सूचनांचे पालन केल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळू शकते. यामुळे मातीची सुपीकता वाढण्यास मदत होते. याशिवाय पाणी आणि खताचा वापर कार्यक्षमतेने होतो. उत्पादनात होणारा धोका कमी होतो. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते. भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, या सूचनांचे पालन करून सोयाबीनचे चांगले उत्पादन घेऊन देशातील तेलबिया उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.