Success Story : 150 एकरात आंबा लागवड; मिळवले विक्रमी उत्पादन, शेतकऱ्याची सर्वदूर चर्चा!

Success Story Of Mango Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्यात आंब्याला मोठी मागणी असते. अक्षय तृतीया सण व त्यानंतर आंब्याची मागणी (Success Story) वाढत जाते. अशातच आता अहमदनगरमधील एका शेतकऱ्याची मोठी चर्चा होत आहे. त्याला कारणही तसेच असून, या शेतकऱ्याने दीडशे एकरांत केशर आंब्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक पद्धतीने हापूस आंबा पिकवलेल्या या शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये उच्चांकी भाव देखील मिळाला आहे. ज्यामुळे त्यास मोठे आर्थिक उत्पन्न (Success Story) मिळण्यास मदत झाली आहे.

नैसर्गिक पद्धतीने आंबा शेती (Success Story Of Mango Farming)

सुधाकर ताके असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी गावचे रहिवासी आहेत. अक्षय्यतृतीयानिमित्त नुकतीच बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक (Success Story) झाली. मात्र, शेतकरी सुधाकर ताके यांनी नैसर्गिक पद्धतीने आंब्याचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यास बाजारात समितीत विक्रमी दर देखील मिळाला आहे.

काही तासांत शंभर कॅरेटची विक्री

शेतकरी ताके यांची दीडशे एकर शेतीत 23 हजार केशर आंब्याचे झाडे आहेत. नैसर्गिक पद्धतीने झाडांची लागवड करून आंबे नैसर्गिकरित्या पिकविण्यात आले आहेत. बाजारात आंबे आले असताना, त्याला प्रति किलो 140 रुपये किलोंचा भाव मिळाला. तर काही तासांतच शंभर कॅरेटची विक्री झाल्याचे ताके यांनी सांगितले. ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांना मागणी

राज्यात प्रगतिशील शेतकरी नैसर्गिक पद्धतीने गुजरातच्या केशर आंब्यापेक्षाही अधिक दर्जेदार पध्दतीचे आंबे (Success Story) पिकवत आहेत. हायब्रीडच्या युगात केमिकलचा अतिवापर करून फळे पिकवले जात असताना ते आरोग्याला घातक ठरत आहेत. ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनाने नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांना अधिक मागणी असल्याचे एका व्यापाराने ताके यांचा आंबा खरेदी करताना म्हटले आहे.

आधुनितेकडे शेतकऱ्यांचा कल

अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पन्न घेतले जाते. मुळा खोऱ्यात गावरान आंब्याचे प्रमाण अधिक असते. दरम्यान, उच्च गुणवत्ता राखली तर उत्पन्नही प्रचंड मिळू शकते हेच जणू शेतकरी ताके यांनी दाखवून दिले आहे. दरम्यान, सध्या अनेक शेतकरी आपल्या कल्पकतेने, आधुनिक पद्धतीच्या वापराने ते शेती करत भरपूर उत्पन्न मिळवत आहेत. द्राक्षे शेती असेल, खरबूज शेती असेल किंवा इतर पिके असतील. शेतकरी सर्वच पिकांतून चांगले उत्पन्न मिळवत आहे.