Success Story : विदेशातील नोकरीला रामराम; सेंद्रिय शेतीतून महिन्याला कमवतोय 2 लाख रुपये!

Success Story Of Organic Vegetable Farming
xr:d:DAF6N11hWmk:2193,j:2605756385453641635,t:24040608
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शिक्षणानंतर अनेक तरुणांचा ओढा शेतीकडे (Success Story) वाढला आहे. शेतीमधील अनेक बारकावे लक्षात घेऊन, सध्या अनेक तरुण शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. विशेष म्हणजे पीक घेण्याआधी त्याबाबत सविस्तर माहिती मिळवल्याने तरुणांना, या पिकांमधुन अधिक नफा मिळवण्यास फायदा देखील होत आहे. आज आपण अशाच एका इंजिनिअर तरुणाच्या शेती व्यवसायामधील यशाबद्दल जाणून घेणार आहोत. जो सेंद्रिय भाजीपाला पिकांच्या लागवडीतुन महिन्याला २ लाखांची कमाई (Success Story) करत आहे.

विदेशातील नोकरीला रामराम (Success Story Of Organic Vegetable Farming)

सत्य प्रवीण असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ओरिसा राज्यातील रायगडा जिल्ह्याचा रहिवासी आहे. सत्य प्रवीण याने इंजिनीरिंगपर्यंत शिक्षण (Success Story) घेतले असून, त्याने आपल्या शिक्षणाच्या जोरावर विदेशात काही काळ नोकरी देखील केली. सत्य प्रवीण याने मलेशिया देशामध्ये आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होते. मात्र, विदेशातील नोकरीत मन नसल्याने, त्याने मायभूमीची वाट धरली. त्यांना नोकरीत वेतनही चांगले मिळत होते. मात्र, शेतीसोबत नाळ जोडलेली असल्याने, शेती करण्याची इच्छा त्यांना माघारी आपल्या मातीमध्ये घेऊन आली.

आधुनिक साधनांचा वापर

सत्य प्रवीण यांची गावी वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी ठिबक सिंचन व्यवस्था (Success Story) उभारली असून, सर्व पिकांची लागवड आधुनिक पद्धतीने करत आहे. आपल्या सर्व जमिनीमध्ये ते बाजारातील अंदाज पाहून भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे ते आपल्या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक खते न वापरता सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित आपला सर्व माल ते जवळच्या शहरांमधील मॉलला पाठवता तसेच काही माल बाजार संमित्यांमध्ये पाठवतात.

टोमॅटो मुख्य पीक

टोमॅटो हे त्यांचे मुख्य पीक असून, अन्य भाजीपाला पिके ते त्या-त्या कालावधीत भावाचा अंदाज पाहून घेतात. सत्य प्रवीण यांना भाजीपाला शेतीतून महिन्याला २ लाखांची कमाई होत असल्याचे ते सांगतात. एकाच पिकाच्या मागे न लागता, पिकांमध्ये विविधता आणल्याने आपल्याला शक्यतो तोटा होण्याचा धोका कमी असतो, असेही ते सांगतात. सत्य प्रवीण यांनी आपल्या शेतीमध्ये जवळपास 60 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून, त्यांना शेतीमध्ये या मजुरांच्या साहाय्याने भाजीपाला रोपणापासून ते खुडणीपर्यंत मोठा फायदा होत असल्याचे ते सांगतात.

शेतकऱ्यांसाठी बनले आदर्श

भाजीपाला शेती ही कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारी शेती असल्याने, सत्य प्रवीण यांनी त्यातून मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. आज ते आपल्या आजूबाजूला पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आदर्श बनले आहे. त्यांची भाजीपाला शेती पाहून बरेच शेतकरी सध्या आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवडीकडे वळाले असल्याचे ते सांगतात.