सांगलीच्या हळद आणि बेदाण्याला भौगोलिक मानांकन ; जाणून घ्या अधिकृत वापरकर्ता बनण्याची प्रक्रिया

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली येथे हळद आणि बेदाण्याची मोठी बाजारपेठ आहे. केवळ आसपासच्या बाजारातूनच नाही तर परराज्यातूनही शेतकरी येथे आपला माल विक्रीसाठी घेऊन येत असतात.विशेष म्हणजे आता सांगली येथील बेदाणा आणि हळद याकरिता भौगोलिक मानांकन मिळाले आहे. भौगोलिक सूचकांक मानांकन ही भारत सरकारतर्फे, उत्पादनांना त्याच्या दर्जानुसार व गुणवत्तेनुसार मानांकन देण्यासाठी राबविण्यात येणारी एक व्यवस्था … Read more

7 वर्षानंतर पहिल्यांदाच पुन्हा धुराळा उडाला…! बैलगाडा शौकिनांमध्ये उत्साह

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रदिर्घ सात वर्षाच्या कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व कोरोनाच्या नियमांचे पालन करत कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे राज्यातील पहिल्या बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडाला. नांगोळी येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील माळरानावर हजारो शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली, … Read more

अबब!!! तब्बल दीड टन वजनाचा रेडा; पाहण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी

सांगली : जिल्ह्यातील तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा. या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिवार कृषी प्रदर्शन भरवण्यात येत … Read more

फुकटात घ्या ढबू ! ट्रॉलीभर ढबू फुकट वाटली ; बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल

हॅलो कृषी ऑनलाईन : दर पडल्याने शेतकऱ्याने फुकट ट्रॉलीभर ढबू मिर्ची फुकट वाटून टाकली. सांगली जिल्ह्यातील कुंभारगाव येथे हा प्रकार घडला. ढबू मिरचीचा दर कोसळल्याने शेतकरी भीमराव साळुंखे यांनी नाईलाजाने मिर्ची फुकट वाटली. ट्रॉलीभर ढबू मिरची अवघ्या २० मिनिटांत संपली. या प्रकाराने शेतकऱ्याची दुर्दशा पुन्हा समोर आली आहे. करोनाचा संसर्ग, लॉकडाऊन आणि महापुरानंतर हळूहळू जीवन … Read more

महापुराचा फटका, 33 हजार हेक्टरहुन अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपले आहे. यातच सांगली सातारा कोल्हापूर या भागात महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता हळूहळू या भागातलं पाणी ओसरू लागले आहे. सांगली जिल्ह्यात पुराचा फटका हा शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला असून शेतकऱ्यांच्या 33 हजार हेक्टरहुन अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या … Read more

चांदोलीत 24 तासात केवळ 15 मिलिमीटर पावसाची नोंद

chandoli dam

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन, तीन आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण मुंबई भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मात्र राज्यातल्या काही भागात अद्यापही पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. अजूनही काही भागात पावसाची प्रतीक्षाच आहे. पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरणक्षेत्रात अद्याप पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. सध्या … Read more

सांगलीचे ड्रॅगनफ्रूट थेट परदेशात, केंद्रीय मंत्र्यांकडूनही कौतुक

हॅलो कृषी ऑनलाईन : ड्रॅगन फ्रुट या फळाला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या फळांचा उपयोग प्रत्येक देशांत केला जातो. आणि आपले भाग्य की महाराष्ट्र राज्यातील सांगली च्या मातीत उगवलेले ड्रॅगन फ्रुट म्हणजेच ‘कमलम’ या फळाची ची निर्यात चक्क विदेशी देशात होत आहे. सांगली जिल्ह्यातील तडसर या गावी पिकवण्यात आलेले ड्रॅगन फ्रुट हे दुबई सारख्या … Read more

error: Content is protected !!