Weather Update : 48 तासांत ‘रेमल’ चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता!

Weather Update Today 25 May 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्याच्या घडीला अवकाळी पावसाचा (Weather Update) जोर काही निवडक भागांमध्ये जाणवत असला तरी आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमन चक्रीवादळामुळे चिंतेत वाढ झाली आहे. येत्या 48 तासांत हे चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात याबाबत भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) इशारा दिला होता. त्यानुसार हे चक्रीवादळ (Weather Update) सध्या तयार होण्याच्या मार्गावर असल्याचे पाहायला मिळत आहे.

रौद्ररुप धारण करण्याची शक्यता (Weather Update Today 25 May 2024)

भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) आपल्या अंदाजात (Weather Update) म्हटले आहे की, शनिवारी (ता.25) रात्रीपर्यंत रेमल चक्रीवादळ रौद्ररुप धारण करू शकते. हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांग्लादेश किनारपट्टीला धडकण्याची दाट शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे काही भागात वादळी वारे देखील वाहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

‘या’ राज्यांना दक्षतेचा इशारा

इतकेच नाही तर रविवारी (ता.26) वाऱ्यांचा ताशी वेग 120 किमीपर्यंत पोहोचू शकतो. परिणामी, 26 आणि 27 मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी भागात तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे. रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, उत्तर 24 आणि दक्षिण 24 परगणा, त्याचबरोबर पूर्व मिदनापूरच्या किनारी जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर उत्तर ओरिसा, बंगाल, त्रिपुरा, दक्षिण मणिपूर आणि मिझोराममध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

भारतीय हवामानशास्र विभागाच्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. शनिवारी आणि रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. काही भागात उन्हाचा कडाका देखील वाढणार आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. दरम्यान, मागील 24 तासांमध्ये जळगाव, अकोल्यात तापमानाचा पारा 45.5 अंशांवर जाऊन पोहोचला आहे. तर छत्रपती संभाजीनगर 43.5, बीड, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 43 अंश सेल्सियसपर्यंत कमाल तापमान पोहचले आहे.