Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता; आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 18 May 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा (Weather Update) अंदाज आहे. तर प्रामुख्याने आज (ता.18) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे. याउलट कोकणात हवामान दमट राहील, असेही हवामान विभागाकडून (Weather Update) सांगण्यात आले आहे.

अरबी समद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Weather Update Today 18 May 2024)

अरबी समद्रामध्ये येमेनच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Weather Update) निर्माण झालेली आहे. तसेच मध्य प्रदेश आणि परिसरावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती पाहायला मिळत आहे. परिणामी, राज्यामध्येही पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निर्माण झाली आहे. ज्यामुळे सध्या राज्यात दुपारपर्यंत उन्हाची ताप तर सायंकाळच्या सुमारास पावसाचे वातावरण दाटून आल्याचे पाहायला मिळत आहे.

मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा सुरूच

गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा (Weather Update) सुरूच आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी (ता.17) वादळी पावसाचा फटका बसला. याशिवाय परभणीत रिमझिम पाऊस होता. तर नागपूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, नांदेड, येथे ढगाळ हवामान होते. तसेच नगर, सोलापूर, पुणे येथे कडक ऊन होते. छत्रपती संभाजीनगर येथे ऊन सावलीचा खेळ सुरू होता. तर नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आहे.

कमाल तापमानात चढ-उतार

दरम्यान, मागील 24 तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. राज्यात सध्या जळगाव 42.8, अकोला 42.4, अमरावती 40.8, ब्रह्मपुरी 41.2, वर्धा 40, वाशीम 41.2, यवतमाळ 40 या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा 40 अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.