हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा (Weather Update) मिळणार असून, 8 जूनपर्यंत राज्याच्या सर्वच भागांत जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार आहे. त्यातही ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मंगळवारी देखील नाशिक, पुणे, लातूर यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व (Weather Update) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
8 जूनपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस बरसणार (Weather Update Today 5 June 2024)
गेल्या काही दिवसांत राज्याच्या सर्वच भागांत उष्णतेच्या लाटेमुळे (Weather Update) उकाडा वाढला होता. त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. याचबरोबर कोकणातील रायगड, मुंबई, पालघर या भागांत दमट तसेच उष्ण वातावरण होते. पूर्व-उत्तर प्रदेशापासून उत्तर कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पार करून कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. अर्थात, या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली असली, तरी प्रभाव कायम आहे. या स्थितीमुळे राज्यात मंगळवारपासून मान्सूनपूर्व पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. हा पाऊस 8 जूनपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बरसणार आहे.
या जिल्ह्यांना 5 ते 8 जून दरम्यान ‘यलो अलर्ट’
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ.
3 ते 4 दिवसांत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होणार
पोषक वातावरण आणि अनुकूल स्थितीमुळे केरळमध्ये पोहोचलेल्या मान्सूनने जोरदार आगेकूच केली आहे. मंगळवारी मान्सून गोव्यासह मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा काही भाग, तेलंगणा, रॉयलसीमाच्या काही भागात दाखाल झालेला आहे. दरम्यान, मान्सूनचा वेग पाहता पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण महाराष्ट्रासह मध्य अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्रप्रदेश, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिसा, बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व भाग तसेच ईशान्य भागात दाखल होणार आहे. दरम्यान, ईशान्य भारताकडे देखील मान्सूनची आगेकूच जोरदार सुरू आहे.